Startup Success Story : रस्त्यावर,गल्लीबोळातून भंगार गोळा करणारा व्यक्ती दिवसाकाठी किती कमावतो. त्यातून त्याला किती फायदा होतो याचा विचार तूमच्याही मनात कधीतरी येत असेल. फार तर फार तो दिवसाला ५०० रूपये कमावत असेल असे तूम्हाला वाटेल. पण, थांबा आपल्याच देशातील दोघा तरूणांनी भंगार गोळा करण्याची कंपनी सुरू केलीय आणि ते वर्षाकाठी १० कोटींची उलाढाल करत आहेत. ऐकूण धक्का बसला ना!. पण हे खरे आहे.
आजकाल स्टार्टअपचा जमाना आहे. या जमान्यात लोक वेगवेगळे भन्नाट बिझनेस आयडीया शोधून काढून त्यातून कोटी रूपये कमावत आहेत. याच प्रकारे भोपाळमधील दोन तरूणांनी लोकांच्या घरोघरी जाऊन भंगार गोळा करण्याची कंपनी सुरू केली आहे. असाही व्यवसाय होऊ शकतो हा विचार लोकांना जास्त प्रेरणादायी ठरत आहे. जाणून घेऊयात याच ध्येयवेड्या तरूणांची गोष्ट
भोपाळमध्ये राहणारा अनुराग असाटी याने भोपाळच्या ओरिएंटल कॉलेजमधून इंजिनीअरींगचे शिक्षण घेतले. याच कॉलेजमध्ये त्याचे मित्र कवींद्र हे प्राध्यापक होते. त्या दोघांनाही काहीतरी वेगळं करण्याचा विचार मनात येत होता. पण, करावं काय याच उत्तर सापडत नव्हते.
2014 हे वर्ष होते जेव्हा या दोघांच्या मनात ‘द कबाडीवाला’ म्हणजे भंगार गोळा करण्याची कल्पना आली. फक्त त्यांनी हे काम ऑनलाईन पद्धतीने करण्याचे ठरवले. म्हणजे, घरातील नको असलेल्या वस्तू गोळा करून आपण भंगारवाला कधी येतो याची वाट पहावी लागते. पण, या अनुरागच्या या कंपनीत लोक स्वत: फोन करून भंगार न्यायला येण्यासाठी फोन करतात.
कंपनी सुरू करण्यासाठी आधी मी वेबसाइट तयार करून स्टार्टअप सुरू केले. सायन्समधून शिक्षण झाल्याने मला ते काम लिलया जमले. मी वेबसाईट बनवली आणि ती शेअऱ केली. त्यावर लोकांच्या ऑर्डरचे फोन येऊ लागले. कबाडीवाला स्टार्टअपची स्थापना करणे सोपे नव्हते. यासाठी त्यांना अनेक चढउतारांना सामोरे जावे लागल, असे कंपनीचे संस्थापक अनुरागने सांगितले.
मी या स्टार्टअपची सुरुवात शून्य गुंतवणुकीने केली होती, पण आज त्याला मुंबईतून 15 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे काम करण्याचा उत्साह अधिक वाढला असल्याचेही तो म्हणाला.
मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरूण आहे.त्यामूळे आम्हाला नेहमी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. माझे वडील जनरल स्टोअरमध्ये काम करायचे. 8 वीत असतानाच माझ्या आईचे निधन झाले. इंजिनीअरिंग करत असताना एक वेळ अशी आली की कॉलेजची फी भरायला पैसे नव्हते.पण, तरीही मी जिद्दीने शिक्षण पूर्ण केल्याचे अनूरागने सांगितले.
हि भन्नाट आयडीया कशी सुचली, यावर तो म्हणतो की, लेक्चर सुरू असताना अशाच एका दिवशी त्याने एका भंगार विक्रेत्याला हातगाडी घेऊन जाताना पाहिले. तेव्हा वाटले की लोक अनेकदा भंगार विकण्यासाठी भंगार गोळा करणाऱ्या लोकांना शोधतात. लोक फोन करून भंगार विक्रेत्याला घरी बोलावतील अशी सिस्टीम होऊ शकते का?, यावर शोधले असता असा व्यवसाय कोणीही करत नसल्याचे लक्षात आले.
सुरुवातीला आम्ही याबाबत घरी कोणालाच माहिती दिली नाही.जे काही सेव्हिंग होते ते या व्यवसायात गुंतवले. इंजिनिअरींग सोडून तो भंगार गोळा करतोय हे ऐकूण घरातल्यांना धक्का बसला. पण, या कंपनीतून होणारा फायदा पाहून कुटुंबियांनीही अम्हाला साथ दिली. सुरुवातीला कुटुंब आणि मित्र या व्यवसायासाठी पुढे आले. त्यांनी दिलेल्या २५ लाखांच्या गुंतवणुकीतून हा व्यवसाय पुढे नेण्यात आला. यानंतर गुंतवणूकदारांचा शोध घेण्यात आला. प्रेझेंटेशन देऊन त्यांना व्यवसाय समजावून सांगितला, अशी माहितीही अनुरागने दिली.
भोपाळमधील लोक ज्या व्यवसायाकडे तिरस्काराने पाहत असत. तो कबाडीवाला आज वार्षाला 10 कोटींहून अधिक उलाढाल करत आहे. यासोबतच या स्टार्टअपने भोपाळ, इंदूर, लखनऊ, रायपूर आणि मोठ्या शहरांमध्ये सुमारे 300 लोकांना रोजगार दिला आहे.
2019 मध्ये देवदूत नावाच्या एका व्यावसायिकाने आमच्या कंपनीत 3 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री गिरिराज सिंह यांनीही अनुरागचा या वेगळ्या स्टार्टअपसाठी कौतूक केले आहे. इंजिनिअरींग सोडून सध्या तरूण अनेक उद्योग करण्यात उतरत आहेत. अशांसाठी अनूरागचा हा व्यवयास एक वेगळा पर्याय ठरू शकतो.
भोपाळच्या स्क्रॅप बेस्ट स्टार्टअप 'द कबाडीवाला'ने हे सिद्ध केले आहे की तुमची विचारसरणी योग्य असेल तर तुम्ही इकडे-तिकडे पडलेल्या रद्दीतून पैसे कमवू शकता. या स्टार्टअपच्या सुरुवातीची कहाणी बेरोजगारी आणि आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या सर्व तरुणांसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन आहे. या कथेची सुरुवात भोपाळमधील दोन तरुणांपासून होते, ज्यांनी रद्दीतून असा स्टार्टअप बनवला, ज्यांना मुंबईतील एका गुंतवणूकदार कंपनीकडून 15 कोटी रुपयांचा मोठा निधी मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.