मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीचे धोरण निश्चित झाले असून, ‘सीबीएसई’ने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी ३०:३०:४० असे गुणसूत्र ठरवले आहे. त्याच धर्तीवर राज्य शिक्षण मंडळाने दहावी, अकरावी या वर्गात मिळालेल्या गुणांचा अंतर्भाव या धोरणात करण्यात येणार असून, दहावीतील २०, अकरावीतील ४०, बारावीतील ४० गुण असे २०:४०:४० गुणांचे सूत्र ठरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.(State Board of Education has fixed the policy of internal evaluation procedure for passing 12th standard students)
विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयारी पूर्ण केल्याने मंगळवारी (ता. २९) हे धोरण शिक्षण विभाग जाहीर करणार असल्याचे समजते. सीबीएसईने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी ३०:३०:४० असे गुणसूत्र ठरवले आहे. त्या धर्तीवर राज्य शिक्षण मंडळाने दहावी, अकरावी या वर्गात मिळालेल्या गुणांचा अंतर्भाव या धोरणात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी त्यांच्या अंतर्गत मूल्यांकनाचा फॉर्म्युला निश्चित झाला नव्हता. यासाठीची जबाबदारी ‘एससीईआरटी’वर होती. त्यावर ‘एससीईआरटी’ने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विविध शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी अंतर्गत मूल्यांकनाचा निश्चित असा फॉर्म्युला तयार केला आहे. त्यामध्ये अकरावीच्या वर्गात मिळालेल्या गुणांवर सर्वाधिक भर असणार आहे. त्यासोबतच बारावीच्या वर्गात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वर्ग तसेच प्रात्यक्षिक, तोंडी आणि इतर कोणकोणत्या परीक्षा यामध्ये सहभाग नोंदवला यावर विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण निश्चित केले जाणार आहेत. दुसरीकडे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या धोरणाचा आधारही घेतला जाणार असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
शिक्षकांना खास प्रशिक्षण
दहावीच्या अंतर्गत मूल्यांकनाच्या धोरणात शाळांना ज्याप्रकारे गुण देण्याचे अधिकार सोपवण्यात आले, त्याप्रमाणे बारावीसाठीही राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. यासाठी दहावीच्या निकालाचे काम करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना खास असे प्रशिक्षण या आठवडाभरात दिले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.