Rupali Chakankar: 'महाराष्ट्रातून २०२२ मध्ये बेपत्ता ५३५', राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणाल्या…

चाकणकर यांनी महाराष्ट्रातून २०२२ मध्ये ५३५ महिला-मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप केला
Rupali Chakankar
Rupali ChakankarEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांमध्ये मुली बेपत्ता झाल्याची प्रकरणे वाढताना दिसून येत आहे. अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातून 2022 मध्ये 535 महिला-मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच या महिलांना-मुलींना मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षी एकुण 535 महिला-मुली बेपत्ता झाल्याची माहीती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. काही एजंट नोकरीचं आमिष देऊन या महिला-मुलींना आखाती देशात नेतात आणि तिथे पोहचल्यानंतर त्यांचे मोबाईल-कागदपत्रे जमा केली जातात, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हंटलं आहे.

Rupali Chakankar
Bacchu Kadu: बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा! नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?

रुपाली चाकणकर बोलताना म्हणाल्या कि, “पुण्याच्या घटनेनंतर मी पोलीस अधिक्षक आणि पोलीस आयुक्तालयात अशा घटनांची माहिती विचारली. तेव्हा २०२२ मध्ये ५३५ महिला बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे. त्यातील मुली-महिलांची मानवी तस्करी झालेली असू शकते. ती शक्यता नाकारता येणार नाही. पुण्यात एक घटना घडली. ते कुटुंब मला येऊन भेटलं आणि त्यामुळे माझ्याकडे ही आकडेवारी आल्याचं चाकणकरांनी सांगितलं आहे.”

Rupali Chakankar
Solapur Crime : 'माहेरून आई-वडिलांकडून 50 लाख घेऊन ये'; हुंड्यासाठी विवाहितेला मारहाण

त्यांना पत्रकाराने हे लव्ह जिहादचे प्रकार आहेत का विचारले असता चाकणकर म्हणाल्या कि, “हे प्रकार लव्ह जिहादचे वाटत नाही. लॉकडाऊनच्या काळात वडील किंवा भाऊ अशा घरातील कर्त्या पुरुषाचं निधन झाल्यामुळे आर्थिक ताण निर्माण झाला. त्यामुळे काही महिला मुलींना व्यावसाय-नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडावं लागलं. या काळात काही एजंटच्या माध्यमातून नोकरीचं आमिष दाखवण्यात आलं. आम्ही तुम्हाला चांगली नोकरी देऊ असं सांगण्यात आलं आणि त्यावेळी नोकरीची गरज असल्याने या महिला मुलींनी एजंटकडे नावनोंदणी केली,” अशी माहिती रुपाली चाकणकरांनी दिली आहे.

Rupali Chakankar
Pune Crime : पुण्यातील धक्कादायक प्रकार! हॉर्न वाजवल्याने तरूणाकडून कारचालकाला मारहाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.