State Employee Strike : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासून दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. दरम्यान, संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संपात सहभागी झाल्यास काम नाही, वेतन नाही धोरण राबवण्यात येणार असल्याचे देखील सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (State Employee Strike In Maharashtra From Today Midnight)
या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी बैठक पार पडली मात्र, त्यात कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथिगृहावर पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव तसेच कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित असणार आहेत. यात जर तोडगा निघाला तर संप मागे घेतला जाणार आहे, अन्यथा संप सुरू राहणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.
संपाची हाक नेमकी कशासाठी
नोकरभरती, जुनी पेन्शन योजना आणि निवृत्तीचं वय वाढवण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आज मध्यरात्रीपासून दोन दिवस संपावर जाणार आहेत. या आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी होणार आहेत. दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे नेमका यावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.