Uddhav Thackeray : त्रिशुळ कसला, हे सरकार एक फुल दोन हाफ! उद्धव ठाकरेंचा दिग्रसमधून जोरदार हल्ला

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray Newsesakal
Updated on

यवतमाळः आजपासून उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली आहे. पक्षाची पडझड झाल्यानंतर ठाकरेंनी पोहरादेवीपासून दौऱ्याला सुरुवात केली. आज त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. काल देवेंद्र फडवीसांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला.

काल गडचिरोली येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. काल बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आमच्यासोबत अजितदादाही आलेले आहेत.

आता आमचा त्रिशुळ तयार झालाय. विकासाचा त्रिशुळ. तो शंकरासारखा भोळा आहे. परंतु जे लोकं महाराष्ट्रात जनसामान्यांच्या विरोधात काम करतील त्यांच्यासाठी तिसरा डोळा बनून त्यांना खाक करणारा त्रिशुळ तयार झाला आहे. असं विधान फडणवीसांनी केलं होतं.

Uddhav Thackeray News
Atal Bihari Vajpayee: फोडाफोडीचे राजकारण..! अटलजींनी शरद पवारांना संसदेत दाखवला होता आरसा

त्याला आज उत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्याचं सरकार हे एक फुल दोन हाफ, असं झालेलं आहे. या सरकारमध्ये दोन-दोन उपमुख्यमंत्री आहेत. आमचं सरकार होतं तेव्हा त्यांनी तीन चाकांचं सरकार आहे, अशी टीका केली होती. आता यांचं तिघांचं सरकार आलंय तर म्हणतात त्रिशुळ आहे.

पोहरादेवीच्या दर्शनानंतर उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांचा मतदारसंघ दिग्रस येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदी-शाह यांच्यासह राज्य सराकर आणि बदलेली नवीन समीकरणं; यावरुन जोरदार टीकास्र सोडलं. शिवाय पोहरादेवी संस्थानने दिलेल्या आशीर्वादाचाही उल्लेख केला.

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray : पोहरादेवी संस्थानने उद्धव ठाकरेंना मानलं दत्तकपुत्र; म्हणाले, आता सरकारच्या नाकात दम...

ते पुढे म्हणाले की, पोहरादेवीच्या दर्शनाला गेलो. सुनिल महाराज आणि साधू-संतांनी आशीर्वाद दिले. मला एक पट्टा दिला, कडं दिलं. या कड्याचं महत्व असं आहे की, आम्ही तुम्हांला दत्तकपुत्र मानतो, असं महंत म्हणाले. त्यामुळे पोहरादेवीचा विकास करुन अभिमान वाटेल, असं चित्र निर्माण करुन दाखवायचं आहे. सरकारच्या नाकात दम आणून तीर्थक्षेत्राचा कायापालट करुन दाखवायचा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.