मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ९३ नगरपंचायतींचा आज निकाल आहे. स्थानिक पातळीवरची निवडणूक असली तरी अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातील काही निकाल हाती आले आहेत. दुपार पाच वाजेपर्यंत जवळपास १२०० जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चढाओढ दिसून येते. (Nagar Panchayat Election 2022 Live Updates)
एकूण 1649 नगरपंचायतींपैकी
भाजप - 384
राष्ट्रवादी - 344
कोंग्रेस - 316
शिवसेना - 284
नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप ठरला क्रमांक एकचा पक्ष
97 नगर पंचायतपैकी भाजपने 19 नगपंचायतींवर थेट विजयी झेंडा फडकावला आहे.
साताऱ्यातील कोरेगाव नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे.
शशिकांत शिंदे यांच्या पॅनेलला अपयश आलं आहे. विधानसभा, जिल्हा बँकेनंतर आता कोरेगाव नगरपंचायतीवर झेंडा फडकावण्यातही त्यांना अपयश आलंय. तिथे शिवसेनेचा झेंडा फडकला आहे.
मंत्री विश्वजित कदम यांना धक्का; कडेगाव भाजपकडे
कडेगावात भाजपकडे १७ पैकी १० जागा गेल्या आहेत. काँग्रेसला ६ तर राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली आहे.
सिंधुदुर्गमध्ये राणेंना धक्का; चारपैकी दोन नगरपंचायची गेल्या मविआकडे
परभणी-पालम नगरपंयाचत राष्ट्रवादीकडे; म्हसळामध्येही सत्ता कायम
धुळ्यात साक्रीमध्ये मतमोजणी दरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी, भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण
कुडाळमध्ये नारायण राणेंना धक्का भाजपला ८, सेनेला ७ तर काँग्रेसला २ जागा
अशोक चव्हाणांनी नांदेडचा गड राखला
नायगाव नगर पंचायत
१७ पैकी १७ जागांवर काँग्रेस विजयी.
मागील वेळी काँग्रेस १३ जागा जिंकली होती.
अर्धापूर नगर पंचायत
१७ पैकी १० जागा जिंकून काँग्रेसला स्पष्ट बहुमत
गेल्या वेळीही काँग्रेसला १० जागा मिळाल्या होत्या.
माहूर नगर पंचायत
१७ पैकी काँग्रेस ६ जागांवर विजयी... गेल्यावेळी काँग्रेसच्या ३ जागा आल्या होत्या...
या नगर पंचायतीत राष्ट्रवादीला ७ तर शिवसेनेला ३ जागा मिळाल्या आहेत...
नांदेड जिल्ह्यात भाजपचा धुव्वा उडाला आहे. माहूरला १ व अर्धापूरला २ मिळून त्यांना नांदेड जिल्ह्यात फक्त ३ जागा मिळाल्या आहेत.
जिल्ह्यातील ५१ पैकी ३३ जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे.
दुपारी १२ पर्यंत १ हजार २३८ जागांचे निकाल हाती
नगरपंचायती
काँग्रेस - ९
भाजप - १९
राष्ट्रवादी - १७
शिवसेना - १३
जागा
राष्ट्रवादी ३१४ जागांवर विजयी
भाजप ३०८ जागांवर विजयी
शिवसेना २५६ जागा
अपक्षांच्या खात्यात १८५ जागा
नाना पटोले यांच्या विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे निकाल
- तिनही तालुक्यात १६ मतदारसंघापैकी चार निकाल हाती, काँग्रेसचं खातं उघडले नाही
- चार निकालांपैकी २ भाजप, एक अपक्ष आणि एक बसपा विजयी
- किन्नी एकोडी जिल्हा परिषदेत भाजपच्या हेमलता नेवारे विजयी
- लाखोरी मतदारसंघ भाजपच्या रेवता पटले विजयी
- मासळ मतदारसंघात बसपाच्या लता नरुले विजयी
- पिंडकेपार जिल्हा परिषदेत अपक्ष दिपलता समरीत विजयी
कुही नगरपंचायत निवडणूक
जिल्हा ; नागपुर
एकूण सदस्य 17
भाजप :- 4
काँग्रेस:- 8
शिवसेना :- 0
राष्ट्रवादी:- 4
स्थानिक:-
इतर- 1 अपक्ष
चंद्रपूर जिल्हा..
जिवती नगरपंचायत
एकूण जागा - १७
काँग्रेस- ६
राष्ट्रवादी-६
गोंडवाना गणतंत्र पक्ष-५
सिंदेवाही
एकूण जागा १७
काँग्रेस- १३
भाजप-३
अपक्ष- १
सावली
एकूण जागा १७
काँग्रेस-१४
भाजप- ३
कोरपना
एकूण जागा १७
घोषित निकाल- १४
काँग्रेस- ११
आघाडी-३
गोंडपिंपरी
एकूण जागा-१७
भाजप-४
काँग्रेस-७
सेना-२
राष्ट्रवादी -२
अपक्ष -२
पोंभुर्णा
एकूण जागा १७
भाजप- १०
शिवसेना- ४
वंचित -२
काँग्रेस -१
हिंगणा - भाजपची बाजी, राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला धक्का; सेनेनं उघडलं खातं
हिंगणा नगरपंचायतीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री रमेशचंत्र बंग यांना धक्का बसला आहे. भाजपने ९ जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीला ५ जागांवर समाधान मानावं लागलं. शिवसेनेनं याठिकाणी खातं उघडल आहे. तर दोन अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली.
कारंजा नगर पंचायतीवर माजी आमदार काळेंचे वर्चस्व
वर्धा जिल्हा कारंजा नगर पंचायत वर माजी आमदार अमर काळे यांचे वर्चस्व ९ काँग्रेस तर ८ भाजपा काट्याची टक्कर झाली. भाजपचे प्रमुख नेते नितीन दर्यापुरकर व माजी सरपंच शिरीष भांगे या भाजपच्या दोन बड्या नेत्यांना मतदारांनी नकारले असले तरी भाजपने यावेळी बरीच मजल गाठली असुन त्यांची संख्या दोन वरून आठवर पोहचली आहे हे विशेष
सांगली : खानापूर नगरपंचायत
काँगेस - शिवसेना आघाडीकडे सत्ता कायम
काँगेस - शिवसेना -९
जनता आघाडी - ७
अपक्ष - ०१
भाजप - ०
खंडाळा नगरपंचायतीत पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादीने चार तर भाजपने २ जागा जिंकल्या आहेत. प्रभाग दोन मध्ये केवळ दोन मतांनी राष्ट्रवादी विजयी. तर प्रभाग चार मध्ये केवळ तीन मतांनी भाजपा विजयी
सातारा शशिकांत शिंदे पराभवाचा अजून एक धक्का, पकड ढिली
गृहराज्यमंत्री शभुराजे देसाई धक्का
कोरेगाव नगरपंचायत : सर्व १७ जागांची मतमोजणी पूर्ण, १३ जागा कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलला आणि चार जागा राष्ट्रवादी पॅनेलला, नगरपंचायतीत सत्तांतर, आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलच्या ताब्यात सत्ता.
कुडाळमध्ये नारायण राणेंना धक्का भाजपला ८, सेनेला ७ तर काँग्रेसला २ जागा
भतकुली नगरपंचायत - आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानाचे वर्चस्व कायम
युवा स्वाभिमान : 9, सेना : 3 ,भाजप : 2, अपक्ष : 2, काँग्रेस : 1
अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघातील अर्धापूर नगरपंचायतमध्ये १७ पैकी ९ जागांचे निकाल जाहीर... काँग्रेस ६ जागांवर विजयी...
नगरच्या कर्जत- जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार कर्जची नगरपंचायत पूर्णपणे राष्ट्रावदीच्या हाती. आता १२ जागा निवडून आल्या आहेत. भाजपला फक्त २ जागा मिळाल्या.
नंदुरबारमध्ये केसी पाडवी यांना धक्का. शिवसेनेचे १३ उमेदवार तर, भाजपला १ जागा
नाशिकच्या देवळा नगरपंचायतील भाजपला ६ जागा...राष्ट्रवादीला १ जागा
कडेगाव - विश्वजीत कदम आणि पृथ्वीराज देशमुखांमध्ये थेट लढत
दापोलीतून राज्यातील पहिला निकाल हाती, दापोली वार्ड २ राष्ट्रवादी विजयी
कुडाळमध्ये शिवसेनेच्या श्रृती वरदम यांच्या गळ्यात माळ, कुडाळमधून भाजपा नयना मांजरेकर विजयी
कळवण नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते कौतिक पगार यांना 545 मते मिळवून विजयी
कळवण नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस खाते उघडले
निफाड नगरपंचायत निवडणूक प्रभाग क्रमांक 1 अरुंधती पवार, बसपा किशोर ढेपले अपक्ष प्रभाग क्रमांक 3 अनिल कुंदे शिवसेना प्रभाग क्रमांक चार शारदा नंदू कापसे शिवसेना प्रभाग क्रमांक ५ पल्लवी जंगम काँग्रेस प्रभाग क्रमांक ६ साहेबराव बर्डे शहर विकास आघाडी हे सर्व विजयी उमेदवार
पुण्याच्या देहूमध्ये एकाच वेळी ९ जागांच्या मतमोजणीसाठी सुरुवात झाली आहे. पुण्यात आमदार सुनिल शेळके आणि भाजपाचे माजी आमदार बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पोस्टल मतदान नसल्याने ईव्हीएममार्फत मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २१ डिसेंबरला झालेले मतदान आणि मागासवर्गीयांच्या अनारक्षित जागांवर मंगळवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १०६ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सर्व जागांकरिता २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार होते.
त्याचबरोबर चार विविध महानगरपालिकांतील ४ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार या कार्यक्रमात अंशतः: बदल करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तत्काळ अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवारी मतदान झाले. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजितपणे २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान पार पडले.
असेही मतदान
राज्य निवडणूक आयोगाने एकूण १०६ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यातील तलासरी, विक्रमगड, मोखाडा, पेठ, सुरगाणा, धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, झरी- जामणी, मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या ११ नगरपंचायतींमध्ये एकही जागा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथील सर्व जागांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान पार पडले. उरलेल्या ९५ नगरपंचायतीतील अनारक्षित ३४४ जागांसाठी १७ जानेवारी २०२२ रोजी मतदान होईल. त्यापैकी शिर्डीतील ४ आणि आणि कळवणमधील २ जागा बिनविरोध झाल्याने तेथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली त्यामुळे आता ९३ नगरपंचायतीतील ३३६ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले.
मतदानाचा टक्का
भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या १० तसेच या दोन्ही जिल्ह्यांतील पंचायत समित्यांतील ४५ जागांसाठीदेखील प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७३ टक्के मतदान झाले. विविध जिल्ह्यांतील १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७६ टक्के मतदान झाले. सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीसुद्धा प्राथमिक अंदाजानुसार ५० टक्के मतदान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.