2000 Rupees Note: दोन हजाराची नोट घेऊन प्रवास करताय? तर ही तारीख लक्षात ठेवा! एसटीने घेतला मोठा निर्णय

2000 Rupees Note: 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत संपत आली आहे.
2000 Rupees Note
2000 Rupees NoteSakal
Updated on

अकोला,ता.6 ः एसटी बसने प्रवास करत असाल आणि तिकिटासाठी दोन हजारांची नोट घेऊन जात असाल तर 28 सप्टेंबर ही तारीख नक्की लक्षात ठेवा. दोन हजारांची नोट चलनातून बाद करण्यासाठी 30 सप्टेंबर ही मुदत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे. त्यापूर्वी दोन दिवस आधीपासूनच राज्य परिवहन महामंडळाने ही नोट न स्वीकारण्याच्या सूचना सर्व विभागातील वाहकांना दिल्या आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. यानंतर RBI ने नागरिकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत त्यांच्या जुन्या 2,000 रुपयांच्या नोटा परत करण्याचे आवाहन केले.

आता 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत संपत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जर 2000 ची नोट अजून बदलली नसेल तर आजच हे काम पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

2000 Rupees Note
Fortune 500 List: मुकेश अंबानींच्या संपत्तीत मोठी वाढ, तर गौतम अदानी यांच्या संपत्तीत 49 टक्क्यांनी घसरण

अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 रोजी संपत आहे

लोकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँकेने 2,000 रुपयांची नोट बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत निश्चित केली आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांना चार महिन्यांचा अवधी मिळाला असून, ते सहजपणे बँकांमध्ये जाऊन जुन्या नोटा बदलून घेऊ शकतात.

2000 Rupees Note
Tata Consumer: नागपूरच्या मिठाई कंपनीत टाटा करणार 51 टक्के गुंतवणूक? काय आहे प्लॅन

2000 रुपयांची नोट कशी बदलायची याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या-

1. जर तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट असेल तर ती तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेत घेऊन जा.

2. यानंतर तुम्ही नोट बदलण्यासाठी स्लिप भरा आणि सबमिट करा.

3. लक्षात ठेवा RBI ने बँकांना 2,000 रुपयांची नोट बदलण्यासाठी स्वतःचे नियम ठरवण्यासाठी सूट दिली आहे.

4. रिझर्व्ह बँकेने लोकांना 20,000 रुपयांपर्यंत म्हणजेच 10 नोटा एकाच वेळी बदलण्याची सुविधा दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.