Shivaji Maharaj Statue: राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका का कोसळला? चौकशी समितीचा अहवाल आला

Rajkot Fort: शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केल्यानंतर त्या पुतळ्याची वेळोवेळी देखभाल करणं गरजेचं होतं. परंतु तसं झालं नाही. म्हणून पुतळ्याच्या स्टीलला गंज चढला. चुकीची डिझाईन, कमकुवत फ्रेम, गंज ही मुख्य कारणं पुतळा कोसळण्यामागची आहेत. या अहवालावरुन राज्य सरकार दोषींवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करणार आहे.
Shivaji Maharaj Statue: राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका का कोसळला? चौकशी समितीचा अहवाल आला
Updated on

सिंधुदुर्गः मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला होता. या घटनेनंतर राज्यात सत्ताधारी विरोधी गटामध्ये मोठं राजकारण बघायला मिळालं. मात्र पुतळा नेमका का कोसळला यांचं कारण स्पष्ट नव्हतं. आता चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून पुतळा कोसळण्याचं कारण स्पष्ट झालं आहे.

पुतळा कोसळण्याला तीन कारणं महत्त्वाची मानली जात आहे. पहिलं कारण आहे गंज, दुसरं कारण कमकुवत फ्रेम आणि तिसरं कारण चुकीची वेल्डिंग. यामुळे पुतळा कोसळल्याचं तपासणी अहवालातून पुढे आलेलं आहे. याशिवाय पुतळ्याचं डिझाईन योग्य नसल्याचंही नमूद करण्यात आलेलं आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केल्यानंतर त्या पुतळ्याची वेळोवेळी देखभाल करणं गरजेचं होतं. परंतु तसं झालं नाही. म्हणून पुतळ्याच्या स्टीलला गंज चढला. चुकीची डिझाईन, कमकुवत फ्रेम, गंज ही मुख्य कारणं पुतळा कोसळण्यामागची आहेत. या अहवालावरुन राज्य सरकार दोषींवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करणार आहे.

Shivaji Maharaj Statue: राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका का कोसळला? चौकशी समितीचा अहवाल आला
Mumbai Manhole Womens Death: मुंबईत मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, BMC आयुक्तांनी उचलले मोठे पाऊल

हा अहवाल सार्वजनिक बांधवाक विभागाच्या सचिवांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. दुसरीकडे या प्रकरणी ठाकरेंचे आमदार वैभव नाईक यांची पोलीस चौकशी होणार आहे. सिंधुदुर्ग पोलीसांनी वैभव नाईक यांना नोटीस पाठवली आहे. वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पुतळ्याला उभारणीत घोटाळा झाल्याचे आरोप केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.