स्ट्रीट फर्निचर टेंडर रद्द झालाय की नाही यावर संभ्रम, एक आमदार म्हणतोय रद्द झालं, पण आदित्य ठाकरेंना कोणतेही पत्र नाही

Street Furniture Scam: फर्निचर टेंडर रद्द केल्याबद्दल मिहिर कोटेचा यांनी मानले होते मुख्यमंत्र्याचे आभार. मात्र, मुंबई महानगरपालिकेकडून अजूनही उत्तर नाही.
Aditya Thackeray
Aditya Thackeray esakal
Updated on

Street Furniture Scam :विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले तेव्हा शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंकडून मुंबई महानगरपालिकेतील स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याविरुद्ध चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते.

भारतीय जनता पक्षाचे आमदार मिहिर कोटेचा यांनी या प्रकरणी आवाज उठवला होता. मुंबई महानगरपालिकेचे स्ट्रीट फर्निरचे २६३ कोटींचे टेंडर रद्द करण्यात आलंय, यावर मिहिर कोटेचा यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे आभार मानले.

भारतीय जनता पक्षाचे आमदार मिहिर कोटेचा म्हणाले की, "मुंबई महानगरपालिकेत स्ट्रीट फर्निचर संदर्भात मी तक्रार केली होती. हे टेंडर अखेर रद्द करण्यात आलेले आहे. 263 कोटी रुपयांचं हे टेंडर होतं मात्र यामध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही गोष्टी घडल्या होतात. याची संपूर्ण माहिती मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कारवाई केली आहे त्याबद्दल मी अभिनंदन करतो." (Latest Marathi news)

या घोटाळ्या प्रकरणी चौकशीच्या आधी मिहिर कोटेजा यांनी सुरुवातीला याविरुद्ध तक्रार दाखल केली होती, तर आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी सर्वत्र आवाज उठवला होता. अखेर हे टेंडर आता रद्द करण्यात आले आहे.

Aditya Thackeray
Assembly Monsoon Session: BMC मध्ये स्ट्रीट फर्निचर घोटाळा, आदित्य ठाकरे यांचे आरोप ! नेमका घोटाळा काय?

यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की," विधानभवनात स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यावर चर्चा झाली. मात्र, हे रद्द झालंय की नाही हे मला माहिती नाही. BMC ने कडून अजूनही असं सांगण्यात आलं नाहीये की हे टेंडर रद्द झालंय. म्हणजे हा घोटाळा आहे स्पष्ट झाल आहे. मी राज्यपालांना पत्र लिहिलंय,ज्यात माझ्या ३ मागण्या आहेत.(Latest Marathi news)

माझी मागणी आहे की ही चौकशी लोकायुक्त महोदयांकडूनच करण्यात यावी.ही माझी पहिली मागणी आहे. दुसरी म्हणजे, या स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यासाठी मुंबई महानगरपालिकेने स्टॉप वर्क आणि स्टॉप पेमेंटची ऑर्डर द्यावी आणि जेवढे काही पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेत ते रिफंड घ्यावेत.तिसरं म्हणजे, जे आम्ही पत्र मागितलेत, कोणते आयटम्स घेत होते, कोणत्या रेटला घेत होते, कुठे लावणार आणि कोणाची मागणी होती, याचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे सुपुर्त करावेत."

आदित्य ठाकरेंच्या या विधानावरुन मात्र संभ्रम निर्माण झालाय. नेमका हे टेंडर रद्द झालंय की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय. या मुद्यावर तीन आमदारांनी सारखा प्रश्न विचारला होता. मात्र, तीनही आमदारांना वेगवेगळ उत्तर देण्यात आलंय.

नेमका काय आहे स्ट्रीट फर्निचर घोटाळा?

स्ट्रीट फर्निचर कंत्राटामध्ये रस्त्यावरील फर्निचर मधील वस्तू खरेदी करण्यासंदर्भात जानेवारी 2023 मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये एकूण 13 वस्तूंचा समावेश होता. या 13 वस्तू एकाच कंत्राटदाराने पुरवाव्यात अशी अट होती.

यामुळे निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांची यादी इथेच कमी झाली होती, तरीही दोन कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आलं होतं. यामध्ये या दोनही कंपन्यांना स्ट्रीट फर्निचरचा पुरवठा करण्याचा कुठलाही अनुभव नसल्याचा आरोप आहे.

या कंत्राटामध्ये डिपॉझिट रक्कम साडेपाच कोटी रुपये ठेवण्यात आली होती. या स्ट्रीट फर्निचरमध्ये कुंड्या आणि बेंच खरेदीवर भर देण्यात आला होता.

चोराने चोरी केली पण आता पुन्हा करणार नाही, म्हणजे चोरी ही झालेली आहे. म्हणजे चोरी ही रद्द झालेली नाही. असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray
Opposition Party Meet : 'नितीश-उद्धव अचानक सेक्युलर झाले…', AIMIM ची विरोधी पक्षांच्या बैठकीवर टीका

बेंच खरेदी नगरसेवक आणि वार्ड यांच्या फंडातून खरेदी केल्या जातात, मग अधिकच्या बेंचेसची गरज काय? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता.

विशेष म्हणजे हे कंत्राट BMC च्या केंद्रीय खरेदी विभागाकडून काढण्यात आलं होतं; जो विभाग आरोग्य विभागातील वस्तूंचे टेंडर काढतो आणि त्याचा पुरवठा आरोग्य विभागाला केला जातो. खरेदीची निविदा रस्ते विभागाकडून का काढण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.(Latest Marathi news)

Aditya Thackeray
Mumbai Local Live Update: पनवेलला जाणाऱ्या गाड्या बंद, पाणी साचल्याने बदलापूर आणि अंबरनाथमधील वाहतूक ठप्प

स्ट्रीट फर्निचर खरेदी करताना कोणत्या आणि किती वस्तू मागवण्यात आल्या आणि त्याची दर्जा आणि किंमत काय याबाबत BMC कडून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

BMC मधील केंद्रीय खरेदी विभागातील अधिकाऱ्यांनी टेंडर फिक्सिंग केल्याचा आरोप ठाकरेंकडून करण्यात आला होता. यासंदर्भात भाजप आमदार मिहीर कोटेचा आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रव्यवहार करून आवाज उठवला होता.

Aditya Thackeray
Sharad Pawar Latest Update: 'मी शरद पवारांकडे भाजपाच्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो, पण…', आव्हाडांनी सांगितली ती घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.