Ajit Pawar : दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई;अर्थमंत्री अजित पवार,‘अन्न औषध प्रशासन’ला आवश्यक निधी देणार

‘राज्यातील नागरिकांना गाय व म्हशीचे निर्भेळ दूध मिळावे. दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. यासाठी राज्य शासन गंभीर आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

मुंबई : ‘राज्यातील नागरिकांना गाय व म्हशीचे निर्भेळ दूध मिळावे. दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. यासाठी राज्य शासन गंभीर आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

दूध भेसळीसंदर्भात विधानसभा सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती सभागृहाला दिली. पवार म्हणाले की, दूध भेसळीच्या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन यापूर्वी राज्य सरकारने दोषींना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा केला होता. हा कायदा राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, दूध भेसळीच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देणे ही शिक्षा तुलनेने फार मोठी असल्याचे राष्ट्रपती कार्यालयाचे मत असावे, त्यामुळे त्यावर अद्याप राष्ट्रपतींची सही झालेली नाही.

दुधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना निर्भेळ-भेसळमुक्त दूध मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. याबाबत शासन गंभीर असून त्यासंदर्भात वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, संबंधित मंत्री महोदयांच्या उपस्थितीत अन्न व औषध प्रशासन विभागाची बैठक घेतली जाईल. दूध भेसळ रोखण्यासाठी विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. दूध भेसळ रोखण्यासंदर्भातील प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यात येतील, अशी ग्वाही पवार यांनी सभागृहात दिली.

अन्न नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळाः आत्राम

भेसळयुक्त अन्न नमुने तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मात्र प्रयोगशाळांची अन्न नमुने तपासण्याची क्षमता मर्यादित स्वरूपाची असल्याने मोठ्या प्रमाणावर अन्न नमुने तपासणीसाठी प्रतीक्षेत असतात. अशा परिस्थितीत ‘पीपीपी’ (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

‘अधिकाऱ्यांना दिले कारवाईचे दरमहा उद्दिष्ट’

भेसळयुक्त दुधाबाबत एका वर्षात १९६ नमुने तपासण्यात आले आहेत. यामध्ये २५ हजार ३३८ लिटर दुधाचा साठा जप्त करून १३ लाख ४४ हजार ४०६ रुपयांचा दंड वसूल केला आहे. भेसळ रोखण्यासाठी २० अधिकाऱ्यांचे विशेष पथकही तयार केले आहे.  भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्याचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना दरमहा उद्दिष्ट दिले आहे, असे आत्राम यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com