Devendra Fadnavis : पुणे पोलिसांची कडक, संवेदनशील कारवाई ;देवेंद्र फडणवीस यांची माहिती,आयुक्तांच्या बदलीची मागणी फेटाळली

पुणे येथील कल्याणीनगर अपघात प्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी हलगर्जी केल्याचा आरोप करत त्यांची बदली करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Updated on

मुंबई : पुणे येथील कल्याणीनगर अपघात प्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी हलगर्जी केल्याचा आरोप करत त्यांची बदली करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केली. मात्र अमितेशकुमार यांनी कडक आणि संवेदनशील कारवाई केली असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली.

गेल्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागात झालेल्या रस्ते अपघातप्रकरणी शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांनी लक्षवेधी विचारली होती. यावर बोलताना दानवे यांनी ‘कल्याणीनगर अपघातप्रकरणी गृह विभाग, परिवहन विभाग, उत्पादन शुल्क विभाग आणि वैद्यकीय विभाग यात अनागोंदी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे निवृत्त सनदी अधिकारी अरुण भाटिया यांनीही पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची बदली करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

आयुक्तांनी या प्रकरणात चांगले काम केले असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ‘‘या प्रकरणात घेण्यात आलेले रक्तनमुने तपासण्यापूर्वी संबंधित आरोपींची तातडीने डीएनए चाचणी करण्यात आली. त्यामुळे घेतलेले रक्त नमुने हे आरोपीच्या आईचे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला अल्पवयीन न समजता, त्याला प्रौढ समजून त्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी पुणे पोलिसांनी केली. त्यामुळेच या गुन्ह्यात आधी लावलेले ३०४ अ कलम बदलून ते ३०४ करण्यात आले. त्यामुळे पोलिस यात कुठेही कमी पडलेले नाहीत,’’ असा निर्वाळा फडणवीस यांनी यावेळी दिला.

‘ससून’मधील गैरव्यवहार पुन्हा उघड

या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये ससून रुग्णालयातील गैरव्यवहार पुन्हा एकदा उघड झाले. त्यामुळे डॉ. तायडे आणि डॉ. हळनूर यांचा यातील सहभाग निदर्शनास आला आणि त्यांच्यावर कारवाई झाली. त्याचबरोबर या अपघातप्रकरणी आरोपीला मदत करणारे त्याचे आई, वडील आणि आजोबा यांनाही अटक केली आहे. ससूनमधील गैरव्यवहारप्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागाला सांगून त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.