"माय 150 रुपये रोजाने शेतात जातीय" परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा संताप

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा संताप
Rajesh-Tope
Rajesh-TopeRajesh-Tope
Updated on

आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे गट - क आणि गट - ड साठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. न्यासा नावाच्या कंपनीला या परीक्षा आयोजनाचे कंत्राट देण्यात आले होते. कंपनीने परीक्षेसाठी आवश्यक तयारी न झाल्याचे सांगत ऐनवेळी परीक्षा घेण्यास नकार दिला.

शनिवार-रविवारी पार पडणाऱ्या परीक्षेसंदर्भात एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी हे जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संताप पसरणं स्वाभाविक आहे. या संपूर्ण प्रकरणावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया देत, परीक्षा रद्द झाली नसून पुढे ढकलण्यात आल्याची सारवासारव केली. मात्र, नुकसान विद्यार्थ्यांचं झाल्याने आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनेक विद्यार्थी गावा-खेड्यातून शहरात दाखल झाले होते. काहीजण तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचले होते. मात्र परीक्षेची तारीख पुढे ढकलल्याचे समजताच विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. आता सोशल मीडियातून यावर प्रतिक्रिया समोर येत आहेत. राजेश टोपे यांच्या ट्विटर हँडलवर विद्यार्थ्यांनी टीका करत नाराजी व्यक्त केली आहे.

एका व्यक्तीने, "गरीबाचं लेकरू 500 रुपये घेऊन परीक्षेला जातंय, तिकडं माय 150 रुपये रोजानं शेतात जाती," असे म्हणत परीक्षा रद्द झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.