'केंद्र सरकारकडून महाराष्ट्राचं वैभव पळवण्याचा प्रकार'

महाराष्ट्राच्या वैभवाची शाहांना दाखल घ्यावीशी वाटत असेल त्यांच स्वागत आहे.
politics
politicsesakal
Updated on
Summary

महाराष्ट्राच्या वैभवाची शाहांना दाखल घ्यावीशी वाटत असेल त्यांच स्वागत आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit shaha) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना खुलं आव्हानं दिलं आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि महाविकास आघाडीने एकत्र लढून भाजपचा पराभव करून दाखवावा, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas aaghadi sarkar) खोचक टोला लगावला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान आता शिवसेनेचे नेते सुभाष देसाई (subhash desai) यांनीही या शहा यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

ते म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित यांचे हे राजकीय भाष्य होते. राज्याला गतवैभव मिळवून देण्यास मविआ हतबल असे अमित शाह म्हणाले आहेत, त्याला योग्य ते उत्तर आमचे नेते देतील. परंतु महाराष्ट्राच्या (Maharashtra) वैभवाची शाहांना दाखल घ्यावीशी वाटत असेल किंवा मदत करायची असेल तर त्यांच स्वागत आहे. महाराष्ट्रातील उद्योग हे केंद्राकडून आणि गुजरातकडून (Gujrat) होत आहेत ते आधी थांबवा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

politics
'केंद्र सरकारकडून महाराष्ट्राचं वैभव पळवण्याचा प्रकार'

पुढे ते म्हणाले, कोरोना काळात 2 दशलक्ष रुपयांचे उद्योग आणले. रोजगारात मोठी वाढ होताना दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात अन्याय होतो आणि वैभव पळवण्याचे प्रकार होत आहे. मागच्या पाच वर्षात पण असा प्रयत्न केला आहे. म्हणूनच सरकार गप्प होतं. पण आम्ही बोलतो. आंतरराष्ट्रीय वित्त केंद्रचा अधिकार मुंबईला आहे. मुंबईत मिथ्या बँका, स्टॉक एकचेंज आहे. दोहा या देशाने जी बँक उघडली त्यांनी मुंबईचा विचार केला आहे. ते जर मुंबईत केले तर त्याचा फायदा झाला असता. परंतु इथे सर्व दिव्याखाली अंधार असल्यासारखं दिसतं आहे, असेही ते म्हणाले आहेत.

नागपुरातील दत्तोपट्टी कामगार ठेंगडी संस्था केंद्रानं हलवली. फिक्टर आणि नर्स टंचाई भासते त्याला महाराष्ट्रनं तोंड दिलं. कोरोनाकाळात (covid - 19) डॉक्टरांनी जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली. या सगळ्याचं जनतेतून कौतुक झालं. इतरांनाही महाराष्ट्राबाबत सांगितलं. महाराष्ट्र हे मोठा राज्य आहे. उत्तरप्रदेशात 27 महाविद्यालय आहेत. 2014 ते 2021 मध्ये केवळ 2 वैद्यकीय महाविद्यालय मिळाली आहेत. यासाठी केवळ 262 कोटींचा निधी दिला असून हा महाराष्ट्रावरचा अन्याय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

politics
'राष्ट्रवादीच्या घशात गेलेला मतदारसंघ काबीज केलाय; ...तर शिक्षेला तयार'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()