Pandharpur Wari: पंढरपूरकडे निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान; CM एकनाथ शिंदेंची माहिती

ashadhi wari 2024 : गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी वारी ‘स्वच्छ वारी निर्मल वारी’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याबरोबरच प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ashadhi wari 2024
ashadhi wari 2024esakal
Updated on

मुंबई : पंढरपूरकडे निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला. वारकरी समाजाचे प्रतिनिधी विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आज शिंदे यांनी हे आश्वासन दिले. दौंड येथील प्रस्तावित कत्तलखान्यास परवानगी दिली जाणार नाही असा शब्दही शिंदे यांनी वारकरी समुदायासमवेत झालेल्या बैठकीत दिला आहे.

आषाढी वारीच्या नियोजनासाठी विशेष बैठकीचे आयोजन आज सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले होते. या बैठकीत वारीच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी वारी ‘स्वच्छ वारी निर्मल वारी’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याबरोबरच प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला सहा प्रमुख दिंड्यांचे प्रतिनिधी, फडांचे प्रमुख, वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर, पंढरपूर संस्थानचे गहिनीमहाराज औसेकर, तसेच राज्य प्रशासनातील सर्व संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

ashadhi wari 2024
Raj Thackeray: "मनासारखा राजा आणि राजासारखं मन! हसत रहा साहेब......"; राज ठाकरेंच्या वाढदिवशी तेजस्विनी पंडितची खास पोस्ट

कत्तलखाना रद्द करण्याचा निर्णय-

दौंड येथील कत्तलखाना रद्द करण्यासाठी बंडातात्या कराडकर हे आंदोलनाच्या पवित्र्यात होते. या कत्तलखान्यामुळे भीमा आणि इंद्रायणी नदी अपवित्र होईल, असे वारकऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे वारकऱ्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन शासनाने हा कत्तलखाना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

ashadhi wari 2024
Patanjali MBBS: NEET परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पतंजलीची मोठी घोषणा; रामदेव यांनी सांगितला प्लॅन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.