- शैलेंद्र बोरकर, पुणेकृषी क्षेत्रातील सुधारणा, शेतीविषयक नवनवीन संशोधन, शेतकऱ्यांना प्रशिक्षण, शेतकऱ्यांसाठी रेडिओ केंद्र, स्थानिक कृषी उद्योगांची स्थापना आणि त्यांचे बळकटीकरण असे अनेक उपक्रम नंदूरबार जिल्ह्यात यशस्वीरीत्या सुरू आहेत. त्यांची ओळख..नंदूरबार जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या सर्वांगीण परिवर्तनाचे लक्षणीय काम गेली चौतीस वर्षे सुरू आहे. शाश्वत शेती, कृषीविषयक प्रशिक्षण, ग्रामविकास, कौशल्य विकास, मुक्त कृषी प्रशिक्षण केंद्र, रेडिओ स्टेशन, पाणलोट क्षेत्र विकास असे अनेक उपक्रम, कार्यक्रम या संस्थेतर्फे सातत्याने राबवले जातात आणि त्याचा शेतीक्षेत्राला मोठा लाभ होतो. नंदूरबार जिल्ह्याच्या विकासासाठी सेवाभावी वृत्तीने महत्त्वपूर्ण कार्य करत असलेली ही संस्था म्हणजे डॉ. हेडगेवार सेवा समिती. संस्थेच्या विविध प्रकल्पांमुळे ग्रामीण क्षेत्राचा, शेतीचा चांगला विकास होत असल्याचा अनुभव आहे..संस्थेतर्फे पाचशे विद्यार्थ्यांची आश्रमशाळा चालवली जाते. या आश्रमशाळेत प्रामुख्याने स्थलांतर करत असलेल्या पालकांच्या पाल्यांची निवड करण्यात येते. शिक्षणाबरोबरच या विद्यार्थ्यांना आधुनिक जगाची ओळख व्हावी यासाठी अद्ययावत संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम याही सुविधा या आश्रमशाळेत आहेत. शिक्षणाबरोबरच भाजीपाला लागवडीसारखे विविध प्रकारचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना दिले जाते. आदिवासी विभागात दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेले अनेक विद्यार्थी या आश्रमशाळेने घडवलेले आहेत..संस्थेतर्फे चालविला जाणारा आणखी एक लक्षणीय उपक्रम म्हणजे रेडिओ विकास भारती. ‘ओढ ज्ञानाची, जोड संस्कृतीची!’ असे या उपक्रमाचे वर्णन करता येईल. या रेडिओवरून कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच अधिकारी, विविध क्षेत्रात काम करत असलेल्या तज्ज्ञांकडून कृषी विषयक माहिती सांगितली जाते. तज्ज्ञांच्या मुलाखती, भाषणे, संदेश यांचे प्रसारण केले जाते.सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे प्रसारण सुरू असते. कृषी विषयक विविध बारा प्रकारचे कार्यक्रम या केंद्रावरून प्रसारित केले जातात. जिल्ह्यातील पंधरा किलोमीटर परिघातील साठ ते पासष्ट गावांना त्याचा लाभ होतो. संस्थेचे जे कृषी विज्ञान केंद्र आहे त्या केंद्रामार्फतच या कार्यक्रमांची निर्मिती आणि प्रसारण केले जाते..गावस्तरीय कृषी उद्योगांची निर्मिती हा देखील संस्थेचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. लोकांची गरज पूर्ण करणारे विविध उद्योग सुरू करणे, ते सुरू करण्यासाठी चालना देणे असे काम प्रामुख्याने केले जाते. मोबाईल राइस मिल, तेल मिल यासारखे अनेक छोटे प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी संस्थेने चालना दिली आहे.नंदूरबार जिल्ह्यातील खांडबारा परिसरात असलेल्या एकोणीस गावांमध्ये सोळा मोबाईल राइस मिल बसवण्यात आल्या आहेत. संस्थेकडून शेतकऱ्याला ही मिल बसवून दिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातच छोटा उद्योग उभा राहतो. गावातच प्रक्रियेची सोय उपलब्ध होते. या उपक्रमाचे अनेक लाभ होत असल्याचा अनुभव आहे..कृषी विज्ञान केंद्र नंदूरबार यांच्या वतीने शेतीविषयक नवनवीन संशोधन केले जाते. त्यांची प्रात्यक्षिके दाखवली जातात. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. कृषी तंत्रज्ञान, विविध पिकांचे वाण, बियाणे निर्मिती, बचत गटांना करता येण्यासारखे कृषी उद्योग, अवजारांचा वापर आदी अनेक विषयांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी केंद्रातर्फे सातत्याने कार्यक्रम केले जातात.कृषी विषयक संदेश शेतकऱ्यांना मोबाईलवरून दिला जातो. दर दोन महिन्यांनी शेतकऱ्यांसाठी कृषक मंडळ हा उपक्रम केला जातो. त्यात शास्त्रज्ञ, प्रगतिशील शेतकरी यांचा सहभाग असतो. त्यांच्याबरोबरच चर्चासत्राचे आयोजन केले जाते.पीक परिसंवाद, बचत गटातील महिलांसाठी उद्योग परिषद, महोत्सव अशा उपक्रमांनाही खूप मोठा प्रतिसाद लाभतो, असा अनुभव संस्थेचे अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले सांगतात. जात्र्या पावरा हे संस्थेचे उपाध्यक्ष, तर कृष्णा गांधी हे कोषाध्यक्ष आहेत..पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमनवापूर तालुक्यात ९४८ हेक्टर क्षेत्रावर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम संस्थेतर्फे राबविला जात आहे. त्यामुळे एका गावाचा सर्वांगीण विकास होत आहे. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, जल व मृदा संधारण, शेती, भाजीपाला लागवड, महिला विकास, लघु उद्योगांची स्थापना आदी उपक्रम त्याअंतर्गत केले जातात. जिल्ह्यातील पन्नास गावांमध्ये कृषी विकास कार्यक्रम राबवला जात आहे.या गावांमध्ये खरीप हंगामात कापूस आणि मका पीक या विषयावर शेतीशाळा आयोजिल्या जातात. अशा १०४ शेतीशाळा झाल्या आहेत. संस्थेच्या या विविध कार्यांची दखल शासनानेही घेतली असून संस्थेला आदिवासी सेवक संस्था या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे..संस्थेचे सचिव डॉ. नितीन पंचभाई सांगतात की, संस्थेसाठी सेवाभावनेने काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांच्या सामुहिक प्रयत्नातून ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या विकासात संस्थेने चांगले काम उभे केले आहे. आणखीही अनेक उद्दिष्ट संस्थेसमोर आहेत आणि ती आम्ही समाजाच्या तसेच कार्यकर्त्यांच्या सहकार्याने नक्कीच साध्य करू..प्रेरणादायी हातांची गाथामाणूस उभा राहतो तो परस्परांच्या प्रेरणांतून. लढणारे हात संकटात सापडलेल्यांना प्रेरणा आणि जिद्द देतात, प्रसंगी मार्गही दाखवितात. अशाच काही लढवय्यांच्या प्रेरणादायी कथा आपल्यासमोर सादर करत आहोत. तुमच्या शेजारी असेच लढणारे लोक असतील तर त्यांची संघर्षगाथा आम्हाला पाठवा. यासाठी फक्त एकच करायचे आहे. क्यूआरकोड स्कॅन करून किंवा नावासह editor.pune@esakal.com या मेलवर तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती पाठवावी. निवडक संघर्षगाथांना आम्ही प्रसिद्धी देऊ.(लेखक ‘सेवा भारती’ या अखिल भारतीय संस्थेचे पदाधिकारी आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.