Sharad Pawar : विधानसभेसाठी शरद पवारांचा '२२५ पार'चा नारा; पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात दिला विजयाचा मंत्र

Sudhakar Bhalerao News : फुटीर नेत्यांवर बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत. तुम्ही येताना वेगळ्या नावाने मतं मागता आणि जाता दुसरीकडे.. हे लोकांना पटत नाही. ज्यांनी जनतेचा घात केला त्या लोकांना धडा शिकवायचा या भावनेनं अपल्याकडे यायचा निर्णय घेतला त्यांचं स्वागत करतो.. सुधाकर भालेराव आणि इतर नेते पक्षात आले आहेत.
Sharad Pawar
Sharad PawareSakal
Updated on

NCP Sharad Pawar News : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या २२५ जागा निवडून येतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला.

भाजपचे उदगीर मतदार संघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश झाला. शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. राज्याचे क्रीडामंत्री तथा अजित पवार गटाचे आमदार संजय बनसोडे यांच्या विरोधात सुधाकर भालेराव यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरच्या वडिलांनी पंकजा मुंडेंसाठी घातलं होतं साकडं, कोण आहेत दिलीप खेडकर ?

पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर राष्ट्रवादी पक्षाला बळ दिलं पाहिजे, असच सगळ्यांना वाटत आहे. आजच्या प्रवेशाचे वैशिष्ट्य आहे.. एक उदगीरचे आणि दुसरे देवळालीचे आहेत. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिला खरा पण दोन्ही विजयी उमेदवारांनी लोकांचा घात केला.

फुटीर नेत्यांवर बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत. तुम्ही येताना वेगळ्या नावाने मतं मागता आणि जाता दुसरीकडे.. हे लोकांना पटत नाही. ज्यांनी जनतेचा घात केला त्या लोकांना धडा शिकवायचा या भावनेनं अपल्याकडे यायचा निर्णय घेतला त्यांचं स्वागत करतो.. सुधाकर भालेराव आणि इतर नेते पक्षात आले आहेत.

Sharad Pawar
Ketaki Chitale: जातपात सोडा हिंदूंनो... केतकी चितळेने शेअर केला जरांगेचा फोटो नाचवणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्याचा व्हिडिओ

शरद पवार पुढे म्हणाले की, राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. पाच वर्षांपूर्वी विरोधी गटाचे फक्त 6 लोक निवडून आले होते. लोकांनी मोदीचे सरकार पाहिले आणि हे बदलण्याचा निर्णय घेतला. यावेळी 31 जणांना निवडून दिलं आहे. या 31 पैकी राष्ट्रवादीच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या २८८ पैकी २२५ जागा निवडून येतील, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com