इतर राज्यांचे मुख्यमंत्री रडताना पाहिलेत का? मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना सवाल

इतर राज्यांचे मुख्यमंत्री रडताना पाहिलेत का?
Uddhav Thackeray  And Sudhir Mungantiwar
Uddhav Thackeray And Sudhir Mungantiwar e sakal
Updated on

जीएसटी केंद्र सरकारकडून दिला जातो. पैसे देणे बाकी आहे, याचा अर्थ राज्य सरकारने कामे थांबवायची असे होत नाही. या सरकारची अडचण ही आहे, काम करता येईना आणि मग जीएसटी आला नाही असे म्हणायचे, असा घणाघाती टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फक्त महाराष्ट्राचा जीएसटी थांबला आहे का? इतर राज्यांचे मुख्यमंत्री रडताना पाहिलेत का?, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. (Sudhir Mungantiwar Attack On Chief Minister Uddhav Thackeray Over GST)

Uddhav Thackeray  And Sudhir Mungantiwar
ज्ञानवापीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपवर निशाणा

सरकार बेईमानी करत आले. हे पहिले सरकार आहे. रोजगार हमी योजनेचे पैसे दिले नाही. सरकारने अनुदान दिले नाही अजून हे गरिबाला केंद्रबिंदू मानून सरकार चालवत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. मंत्रालयात आज निर्णय घेतले जात नाही. कॅबिनेटमध्ये मोहाच्या दारूला विदेशी म्हणा असा निर्णय होतो. देव करो यांना सायकलवर फिरायला लागो. पेट्रोल-डिझेल किंमत इतर राज्य कमी करत असून त्यांच्याकडून काही तरी शिका, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला.

Uddhav Thackeray  And Sudhir Mungantiwar
नवाब मलिकांच्यावर ईडी कारवाई होताच मुनगंटीवार,भातखळकर म्हणाले...

मोहित कंबोज यांच्यावरील कारवाईवर मुनगंटीवार म्हणाले, अनेक नेत्यांना अडकवण्यासाठी पोलिसांचा दुरुपयोग केले जात आहे. हे सरकार कधीही जनतेच्या धक्क्याने जाऊ शकते, से भाकित त्यांनी वर्तवले आहे. जे आमदारांचा अपमान करतात त्यांनी माफी मागावी. इथे येणारे आमदार का घोडे आहेत का? तुम्ही विकाऊ आहात आमदारांवर शंका उपस्थित करू नका, असे ते म्हणाले. मी प्रत्येक आमदारांना सांगू शकतो की यांनी तुमचा अवमान केला आहे. आता यांना दाखवून द्या आणि सद्सद्विवेक बुद्धीने मत द्या, असे आवाहन राज्यसभा निवडणुकीसाठी मुनगंटीवार यांनी आमदारांना केले.

Uddhav Thackeray  And Sudhir Mungantiwar
महापालिकेसाठी महाविकास आघाडी होणार?

सर्जिकल स्ट्राईकवर टीका करणारी शिवसेना सर्गील उस्मानी आणि सावरकरांचा अवमान झाला तेव्हा एक शब्द बोलली नाही. काँग्रेसने कोणाला उमेदवारी दिली त्यांनी अनेकदा वादग्रस्त भाषण केली ज्याने संविधानाला विरोध केला त्याला उमेदवारी दिली, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला. ती जागा आम्ही का मागे घेऊ ती जागा आम्ही लढवणार आहोतच. अपक्ष काय तुमच्या तिकिटावर निवडून आले आहेत का? तुम्हाला पाठिंबा दिला तर ते काय आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार असे वचन दिले आहे का? ते भाजपच्या बाजूने पण येतील ना. तुम्ही आता तुमचे आमदार सांभाळा, असा सल्ला राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीबाबत मुनगंटीवार यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.