Sudhir Mungantiwar : ''नशेच्या पदार्थांचे लायसन्स असलेल्या नेत्यांना ठेचून काढलं पाहिजे''

Sudhir Mungantiwa
Sudhir Mungantiwasakal
Updated on

मुंबईः ड्रग्ज व्यवसायात कोणत्याही नेत्याचा संबंध असता कामा नये, अशा नेत्यांना ठेचून काढलं पाहिजे असं विधान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यांनी ड्रग्ज प्रकरणावर बोलताना काँग्रेस नेत्यांवर आरोप केले.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जी लोकं ड्रग्जशी संबंधित असतात त्यांना सोडलं नाही पाहिजे, ठेचून काढलं पाहिजे. यात दुमत असण्याचं काहीही कारण नाही. काँग्रेसचे असे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे नशेच्या पदार्थांचं लायस्नस आहेत. त्यांची यादीच माझ्याकडे आहेत.

Sudhir Mungantiwa
Onion Subsidy: शेतकरी, निराधारांची यंदाची दिवाळी गोड! राज्यात कांदा अनुदानासाठी 'इतके' कोटी मंजूर

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, मुळात राजकीय नेते, आमदार, खासदार आणि त्यांच्या नातेवाईकांकडे नशेच्या पदार्थांचं लायसन्स नसलं पाहिजे. तसा नियमच पाहिजे. दारुविक्रीचे परवाने असलेले काँग्रेसचे अनेक नेते आहेत. त्यांची यादीदेखील आहे, असं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं.

Sudhir Mungantiwa
Maratha Reservation: मनोज जरांगे पुन्हा मैदानात! राज्यभर करणार दौरे, असा असेल पुढचा प्लॅन

दरम्यान, ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकमेकांना टार्गेट केलं आहे. त्यातच मुनगंटीवार यांनी थेट काँग्रेसवर आरोप केले आहेत. काँग्रेसच नेत्यांची यादी आहे, असं म्हणणाऱ्या मुनगंटीवारांना काँग्रेस नेत्यांकडून काय उत्तर मिळतं, ते बघावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.