Sugar MSP : साखरेची ‘एमएसपी’ प्रतिक्विंटल ३७२० रुपये करा - दिलीप वळसे पाटील

साखरेची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रतिक्विंटल ३ हजार ७२० रुपये करा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली.
sugar
sugarSakal
Updated on

पुणे - साखरेची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रतिक्विंटल ३ हजार ७२० रुपये करा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली असल्याचे राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी (ता. १२) पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितले.

यंदाच्या पावसाळ्यात उसाचे क्षेत्र असलेल्या भागात आतापर्यंत खूप कमी पाऊस झाला आहे. यामुळे ऊस उत्पादन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी आगामी ऊस गळीत हंगामाची परिस्थिती बिकट होण्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तविली.

राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री जयंत पाटील, राजेश टोपे, नरेंद्र मुरकुंबे, प्रकाश नाईकनवरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

वळसे पाटील पुढे म्हणाले, ‘राज्यातील गेल्या वर्षीच्या ऊस गळीत हंगामाची स्थितीही बिकट होती. यामुळे मागील साखर हंगामाच्या तुलनेत २६६ लाख मेट्रिक टनाने गाळप कमी झाले आहे. परिणामी ३२ लाख टनांनी साखर उत्पादन कमी झाले आहे.

गेल्या वर्षी जून व जुलै या दोन महिन्यात पावसाने दिलेली ओढ व ऐन हंगाम सुरु होत असताना आक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यात झालेला प्रचंड अवकाळी पाऊस याचा साखर उद्योगावर विपरीत परिणाम झाला. यामुळे राज्यातील उसाची उत्पादकता प्रति हेक्टर ७७.८० टनाने कमी होऊन, साखरेच्या उताऱ्यातसुद्धा ०.४२ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.