Summer : उष्णतेच्या लाटेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून मिळाली सवलत

राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे.
summer increase
summer increasesakal
Updated on

पुणे - राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे उष्ण वातावरणाचा शालेय विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, म्हणून राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यापासून सवलत दिली आहे.

राज्यात सर्वत्रच उष्णतेची लाट पसरल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळांमध्ये उपस्थित राहण्यापासून सवलत मिळावी, किंवा शाळांना उन्हाळी सुटी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी होत होती. या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर होता.

आता या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपासून (ता.२२) शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात आली आहे.

याशिवाय राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यासंदर्भात शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षण संचालक आणि माध्यमिक शिक्षण संचालक यांना सूचना देखील दिल्या आहेत.

तसेच, राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा, असेही शिक्षण विभागाने सूचित केले आहे.

या निर्णयानुसार सूचनांचे पालक होईल, याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांनी यांनी दक्षता घ्यावी, असा आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उप सचिव तुषार महाजन यांनी दिला आहे. उष्णतेची लाट असताना किंवा रणरणत्या उन्हात हजेरीसाठी शाळा गाठण्यापासून विद्यार्थ्यांना सवलत मिळाली असल्याने पालक निश्चित झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.