सोलापूरात दोन दिवस संगीत मेजवानी! शनिवार व रविवारी सुन्द्री सम्राट संगीत महोत्सव

येथील सुन्द्री सम्राट कै. सिद्राम जाधव सांस्कृतिक कला मंडळ सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, केंद्रीय संगीत नाटक अकादेमी युसी न्यू जर्सी अमेरिका, मल्हार डिजीटल, गितांजली पेन्ट, हॉटेल ऐश्वर्या यांच्या संयुक्त विद्यमाने ता. २३ व २४ जुलै रोजी सुन्द्री सम्राट संगीत महोत्सव आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव पंडित भिमण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
music festival
music festivalsolapur sakal
Updated on

सोलापूर : येथील सुन्द्री सम्राट कै. सिद्राम जाधव सांस्कृतिक कला मंडळ सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, केंद्रीय संगीत नाटक अकादेमी युसी न्यू जर्सी अमेरिका, मल्हार डिजीटल, गितांजली पेन्ट, हॉटेल ऐश्वर्या यांच्या संयुक्त विद्यमाने ता. २३ व २४ जुलै रोजी सुन्द्री सम्राट संगीत महोत्सव आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव पंडित भिमण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जाधव म्हणाले, शनिवार ता.२३ जुलै रोजी सायं- ५.३० वाजता. हिराचंद नेमचंद वाचनालय, किर्लोस्कर सभागृह येथे सोलापूर पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, महाराष्ट्र राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे संचालक बिभिषण चवरे, महिला व बाल विकास विभागीय उपायुक्त संजय माने यांच्या हस्ते सुन्द्री सम्राट संगीत महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी महोत्सवाची सुरूवात पाचव्या पिढीचे बाल कलाकार मास्टर व्यंकटेशकुमार जाधव, मास्टर सिद्राम जाधव, नरेंद्र बंजत्री, शकुंतला जाधव, अश्विनी माने, कलाश्री जाधव यांच्या सामूहिक सुन्द्री वादन यांना नितीन दिवाकर हे सहकलावंत म्हणून तबल्याची साथ करतील. तसेच यावेळी आंतराष्ट्रीय किर्तीचे अभिषेक बोरकर यांचे सरोद वादन यांना सहकलावंत म्हणून पंडित डॉ. रविकिरण नाकोड हे तबला साथ करतील. मध्यप्रदेश, भोपाळ येथील अफजल हुसेन यांचे धुप्रद गायन सादर करतील. त्यांना लातूरचे गोपाळ जाधव यांचे सहकलावंत म्हणून पखावज साथ करतील. पंडित अतुलकुमार उपाध्ये व पंडित भिमण्णा जाधव यांचे वायोलिन व सुन्द्री वाद्याचे जुगलबंदी कार्यक्रम होईल. त्यांना पंडित डॉ. रविकिरण नाकोड हे तबला साथ लाभणार आहे. रविवार ता. २४ जुलै रोजी सकाळी ९ वाजता बेंगलोरचे पंडित रुद्रेश बंजत्री व मुंबईचे सदाशिव कोरवी यांचे सामुहिक जुगलबंदी सनईवादन पंडित मनमोहन कुंभार तबला साथ करतील. बनारसच्या शास्त्रीय गायिक तेजस्वीनी वेर्णेकर यांचे शास्त्रीय गायन त्यांना पंडित मनमोहन कुंभार तबला साथ तर राजकुमार सावळगी हे संवादिनी साथ करतील. आंतरराष्ट्रीय किर्तीचे पंडित मिलिंद तुळणकर यांचे जलतरंग वादन होईल. त्यांना गणेश तानवडे हे तबला साथ करतील. श्रीनिवास काटवे, अंबिका काटवे, भरतनाट्यम नृत्य शिष्य समूहित पारंपारिक नृत्य सादर करतील.

रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा

संगीत महोत्सवाचे सूत्रसंचालन दिपक कलढोणे करणार आहेत. कार्यक्रम सर्वासाठी मोफत असून, रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पंडित भिमण्णा जाधव यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस श्रीनिवास काटके, लक्ष्मण जाधव, विशाल लालसंगे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.