Sunetra Pawar: खासदार सुनेत्रा पवार मोदीबागेत शरद पवारांच्या भेटीला... राजकीय अर्थ नाही खरे कारण आले समोर

Sharad Pawar Sunetra Pawar Meet Sparks Subject for Discussion: शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यातील या भेटीमुळे राज्यातील राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
Sunetra Pawar And Sharad Pawar Meeting
Sunetra Pawar And Sharad Pawar MeetingEsakal
Updated on

गेल्या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला होता. त्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. अशात आज पुण्यातील मोदीबाग येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवार यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार तब्बल एक तास होत्या. त्यानंतर त्या तेथून रवाना झाल्या.

शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यातील या भेटीमुळे राज्यातील राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

या सर्व घडामोडींवर राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी साम टीव्हीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना विजय चोरमारे म्हणाले,"सुनेत्रा पवार मोदीबागेत गेल्या होत्या हे खरे असले तरी त्या शरद पवार यांना भेटल्या आहेत की नाही याबाबत निश्चित माहिती नाही. जरी त्या शरद पवार यांना भेटल्या असल्या तरी यामध्ये ही कौटुंबिक भेट असू शकते याचे राजकीय अर्थ काढता येणार नाही. कारण सुनेत्रा पवार जरी राज्यसभा खासदार असल्या तरी पक्षाच्या वतीने राजकीय चर्चा करण्याइतके अधिकार त्यांच्याकडे अजून नसावेत आणि पक्ष त्यांच्याकडे अशी काही जबाबदारी देईल असे वाटत नाही."

Sunetra Pawar And Sharad Pawar Meeting
Ajit Pawar: विधानसभेच्या तोंडावर अजित पवार टाकणार मोठा डाव! 'या' पक्षांना बरोबर घेत स्थापन करणार तिसरी आघाडी?

या प्रकरणावर पुढे बोलताना विजय चोरमारे म्हणाले, "दुसरी गोष्ट अशी की शरद पवार, पवार कुटुंबातील वडिलधारे गृहस्थ असल्यामुळे त्यांची आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली असेल तर ती कौटुंबिक भावनेतून झाली असणार आहे. म्हणून या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण असू शकेल असे वाटत नाही."

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर काल छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानी भेट घेतली होती. आता आज सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही भेटींचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

भेटीचे खरे कारण समोर

शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीची सर्वत्र चर्चा होत असली तरी, पवार यांची बहीण रुग्णालयात आहेत. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रितपणे त्यांना भेटायला गेले आहेत. यावेळी अजित पवार यांच्या बहिणीबरोबर सुनेत्रा पवार देखील आहेत. त्यामुळे या भेटीला कोणताही राजकीय अर्थ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sunetra Pawar And Sharad Pawar Meeting
Vishalgad Encroachment: "विशाळगडावर भिडेंच्या धारकऱ्यांचा धुडगूस," प्रकाश आंबेडकरांच्या आरोपामुळे खळबळ

या सर्व पार्श्वभूमिवर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत झाली होती. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर सुमारे लाखभर मतांनी विजय मिळवला होता.

दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रावादीने या निवडणुकीत दमदार कामगिरी करत 8 जागांवर विजय मिळवला होता. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदरात अवघी एक जागा पडली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.