राज्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव?, मंत्री सुनील केदार म्हणाले..

राज्याचे पुनर्वसन मंत्री सुनील केदार यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील केदार
सुनील केदारईसकाळ
Updated on
Summary

राज्याचे पुनर्वसन मंत्री सुनील केदार यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

शहापूर (shahapur) तालुक्यातील वेहळोली येथील एका फार्ममध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची (Bird flu) लागण झाली असून आतापर्यंत ३०० हून अधिक कोंबड्या दगवल्या आहेत. (More than 300 hen died) या घटनेची गांभीर्याने दाखल घेत, पशुसंवर्धन विभागाने (Department of Animal Husbandry) एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कोरोनानंतर आता हा व्हायरस पुन्हा डोकं वर काढणार का, अशा उलट सुलट प्रश्नांनी जोर धरला आहे. दरम्यान, आता राज्याचे पुनर्वसन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. आज रत्नागिरीत ते बोलत होते.

सुनील केदार
शहापूर तालुक्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; ३०० हून अधिक कोंबड्या दगावल्या

ते म्हणाले, काल शहापूर येथे तीनशे कोंबड्या दगावल्या आहे. या ठिकाणी पुनर्वसन विभागाची टीम पोहचली असून त्यांनी तपासणी सुरु केली आहे. जिथे या व्हायरसचे सॅपल मिळालेत तो परिसर सील केला आहे. हे सॅम्पल पुण्याला (Pune) पाठवले आहेत. त्याचे अहवाल आज संध्याकाळपर्यंत मिळतील. दक्षता म्हणून म्हणून योग्य ती काळजी घेतली असून संबंधित सूचना टीमला देण्यात आल्या आहेत. तसेच ज्यांचे या घटनेत नुकसान झाले त्यांनाही भरपाई दिली जाणार आहे. काही काळात इतक्या तातडीने हा व्हायरस (virus) कसा आला याची माहिती घेऊ याची चौकशी करणारनअसल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रशासन नियम आणि ठरेलेल्या रुपरेषांचे पालन करण्यासाठी योग्य ती अमंलबाजावणी करणार आहे. क्कुकटपालन ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा मदत करणारा महत्वाचा उद्योग असून अनेक तरुण यामध्ये काम करतात, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, बाधित क्षेत्रापासून एक किमीच्या परिघात असलेल्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या. तसेच त्यांचे खाद्य व अंडी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली असून बधित क्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील चिकन विक्रेते, वाहतूकदारांचे दैनंदिन कामकाज रोखण्याबाबतही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

सुनील केदार
अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ जणांना फाशीची शिक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()