Maharashtra Politics Update : अजित पवारांच्या बंडाला ज्या लोकांनी पाठिंबा दिला आहे त्या सर्व राष्ट्रवादीच्या नेत्या-पदाधिकाऱ्यांवर स्थानिक पातळीवर आज कारवाईला वेग आला आहे. अजित पवार यांच्या शपथविधीला पाठिंबा देऊन आणि शपथविधीला उपस्थित राहून तटकरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात करण्यात येत आहे, असं ट्विट शरद पवार यांनी केलं. तर शरद पवार यांच्या या कारवाईच्या ट्विटला सुनील तटकरेंनी अश्लाघ्य भाषेत उत्तर दिलेला एक स्क्रीनशॉट सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)
तर यासंबधी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी ट्विटरवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे. सुनील तटकरे यांच्या नावाने फेक अकाउंट काढण्यात आलं असून फेक अकाउंटवर सुनील तटकरे यांच्या फोटोसह नावाचा वापर करण्यात आला आहे. शरद पवार यांनी कारवाईसंबधी केलेलं ट्विट शेअर करत या अकाऊंटवरुन अश्लाघ्य भाषेतील मजकुराविरोधात तटकरेंनी तक्रार केली आहे.(Latest Marathi News)
तर या पोस्टवर तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, 'माझ्या नावासारखे नाव वापरून व माझा फोटो वापरून ट्विटरवर एक फेक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. त्यावरून अश्लाघ्य भाषेत मजकूर प्रसारित केला जात आहे. या अकाऊंटविरोधात मी रीतसर तक्रार केलेली आहे. तरी हे फसवे अकाऊंट असल्याची आपण नोंद घ्यावी', अशी एक पोस्ट त्यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.(Latest Marathi News)
अजित पवार यांच्या गटाने सुनील तटकरेंची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या शपथविधीला पाठिंबा देऊन आणि शपथविधीला उपस्थित राहून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे, असं ट्विट शरद पवार यांनी केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.