Sunil Tatkare: "यशवंतरावांच्या विचारांचा ढिंढोरा पिटणाऱ्यांनी..."; तटकरेंचा शरद पवारांवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापण दिन साजरा होत आहे, या निमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार सुनिल तटकरे बोलत होते.
Sunil Tatkare
Sunil Tatkaresakal
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापण दिन साजरा होत आहे, या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार सुनिल तटकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसदार असल्याचा दिंडोरा पिटणारे असा उल्लेख करत त्यांनी पवारांवर हल्लाबोल केला. (Sunil Tatkare targets Sharad Pawar background lok sabha election 2024 social media campaign against Ajit Pawar)

Sunil Tatkare
Narendra Modi: विरोधकांना मोदींच्या शपथविधीचं निमंत्रणच नाही; जयराम रमेश म्हणतात, एक तृतीयांश पंतप्रधान...

तटकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एकच जागा मिळाली पण याची संपूर्ण जबाबदारी अजित पवारांनी स्विकारली ती त्यांची एकट्याची जबाबदारी नसून आमची सर्वांची आहे. हा एकट्या अजितदादांचा पराभव नाहीतर राष्ट्रवादीच्या सर्वांचाच पराभव आहे.

Sunil Tatkare
Vishal Patil : जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची बांधणी होणार का?

एका गोष्टीचं शल्य जरुर आहे की, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेचे वारसदार आम्हीच आहोत, असा दिंडोरा पिटणारी काही मंडळींकडून लोकसभेच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रचारसभांमधून अजित पवारांबाबत क्लेषकारक विधान केली गेली. टिक्काटिपणी व्हावी ती धोरणांवर व्हावी पण अरेतुरे करत होऊ नये, अशा शब्दांत तटकरेंनी शऱद पवारांवर निशाणा साधला.

दरम्यान, या लोकसभेत केवळ एक जागा मिळालेली असली तरी सुद्धा आज महाराष्ट्रातील कार्यकर्त्याचा आत्मविश्वास जराही कमी झालेला नाही. एका निवडणुकीतून परिमाणं बदलली जात नसतात. राजकारणात प्रत्येक निवडणुक वेगळ समिकरण घेऊन येत असतात. या निवडणुकीत पाच टप्प्यातील निवडणुकीत प्रत्येकवेळी समिकरण बदलत गेली त्याचा फटका महायुतीला बसला. तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादीची विधीमंडळ पक्षाची बैठक झाली त्यात प्रत्येक आमदारानं सांगितलं की निवडणुकीत आमचं काहीही बरंवाईट झालं तरी आम्ही अजिदादांच्या पाठीशी उभं राहणार आहोत, असंही यावेळी सुनील तटकरे यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.