Ajit Pawar : पुरवणी मागण्या गोंधळात मंजूर;उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सादर

सभागृहात आरक्षणावरून गोंधळ चालू असतानाच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधिमंडळात ९४ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या मान्य करून घेतल्या. चर्चा न करताच मागण्या मान्य केल्याने विरोधकांनी टीका केली.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

सभागृहात आरक्षणावरून गोंधळ चालू असतानाच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधिमंडळात ९४ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या मान्य करून घेतल्या. चर्चा न करताच मागण्या मान्य केल्याने विरोधकांनी टीका केली.

अजित पवार पुरवणी मागण्या मान्य करून घेत असताना सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू होता. आरक्षणावरून सत्ताधारी पक्ष अधिक आक्रमक झाल्याने सभागृहात मोठ्या प्रमाणात शेरेबाजी सुरू होती. मराठा आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठकीवरून सत्ताधारी आमदारांनी विरोधकांना धारेवर धरले. विरोधी पक्षांनी आरक्षणाबाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे म्हणत ते अध्यक्षांच्या समोर लॉबीमध्ये जात घोषणा देत होते. याचवेळी पवार यांनी या गोंधळात पुरवणी मागण्या मान्य करून घेतल्या. सकाळच्या सत्रात चार वेळा सभागृह तहकूब करावे लागले.

एकूण ९४ हजार ८८९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी १७ हजार ३३४ कोटींच्या मागण्या अनिवार्य खर्चाच्या, ७५ हजार ३९ कोटींच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या तर २ हजार ५१५ कोटींच्या मागण्या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसाहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने आहेत. विधिमंडळाच्या इतिहासातील या आतापर्यंतच्या सर्वाधिक रकमेच्या पुरवणी मागण्या ठरल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.