पालघर साधू  हत्या प्रकरण: सुप्रीम कोर्टानं बजावली राज्य सरकारला नोटीस....

supreme court of India
supreme court of India
Updated on

मुंबई: गावात आलेले चोर समजून काही महिन्यांपूर्वी पालघर जिल्ह्यात साधूंची निर्घृण हत्या करण्यात आली होती.  ग्रामस्थांनी त्यांच्यावर दगडफेक करत काठीनं हल्ला केला होता. या प्रकरणात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. यात दोन साधू आणि त्यांच्या गाडी चालकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात सीबीआय चौकशीबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे.

जूना आखाड्यातले काही साधू आणि साधूंच्या नातेवाईकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात संशयाची सुई पोलिसांवर आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांच्या तपासावर त्यांचा विश्वास नाही असं या याचिकेत म्हंटलं आहे. म्हणून तपास सीबीआयनं केला पाहिजे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला, डीजीपी, सीबीआय आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तसंच १ मे ला पालघरमध्ये साधूंच्या हत्येच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारकडे तपासाचा 'स्टेटस रिपोर्ट' मागवला आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं सध्या तपासावर बंदी घालण्यासाठी नकार दिला आहे.

दरम्यान, सीबीआयकडून चौकशी व्हावी या याचिकेवर तसंच NIA कडूनही चौकशी व्हावी अशी मागणी करणार्‍या याचिकेवरही राज्य सरकारला नोटीस देण्यात आली आहे. या याचिकांवर जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात सुनावणी होणार आहे असं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र अशीच एक याचिका मुंबई उच्च न्यायालयातही आहे हे  सांगत महाराष्ट्र सरकारनं या याचिकेला विरोध  केला आहे. 

Supreme court gives notice to state government in palghar case 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.