Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांचं मशाल चिन्हही जाणार? सुप्रीम कोर्टात आज फैसला

Published on

Thackeray Shivsena Latest Update : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली, यानंतर शिवसेनेत उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट पडले. या सत्तासंघर्षाच्या लढाईदरम्यान शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण काही काळासाठी गोठवण्यात आलं आणि नंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण दोन्ही एकनाथ शिंदे गटाला मिळाले.

दरम्यान उद्धव ठाकरे गटाला निवडणूकत देण्यात आलेलं मशाल हे चिन्ह देखील आता अडचणीत आलं आहे. या समता पार्टीने उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्याबाबत सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाकडून मशाल चिन्ह देण्यात आले होते त्याविरोधात समता पार्टी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

उद्धव ठाकरेंना दिलेल्या मशाल चिन्हावर समता पार्टीचा आक्षेप असून समता पार्टीचे उदित मंडल यांनी सुप्रीम कोर्टात याबद्दल याचिका दाखल केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे मशाल चिन्ह राहणार की जाणार याचे भवितव्य आजच्या सुनावणीवर अवलंबून राहणार आहे. यापुर्वी मंडल यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती, पण कोर्टानं ती रद्दबातल ठरवली होती त्यामुळं समता पार्टीनं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

 Uddhav Thackeray
NCP Crisis : फुटीर गटाची शरद पवारांशी चर्चा, सोबत काम करण्याचं आवाहन; पवारांचं मात्र मौनच

आजच्या निकालाच्या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. १९९६ पासून मशाल हे आमचं पक्ष चिन्ह आहे, असं सांगत समता पक्षाच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेले 'मशाल' हे चिन्ह अंतरिम स्वरूपाचे नाही. तर ते अंधेरी पोटनिवडणुकीनंतर त्याच्या पुनर्वाटपाबाबत विचार केला जाऊ शकतो, असं उत्तर निवडणूक आयोगाने समता पक्षाला दिले होते. मात्र, उत्तराचे समाधान न झाल्याने समता पक्षाने कोर्टात धाव घेतली आहे.

 Uddhav Thackeray
Monsoon Session : विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसच्या दुसऱ्या फळतील नेत्यांना संधी; 'ही' नावे चर्चेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.