सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला दिलासा! NGT च्या 12 हजार कोटींच्या दंडावर स्थगिती

Supreme Court Stays NGT Orde
Supreme Court Stays NGT Orde
Updated on

Supreme Court Stays NGT Order: घन आणि द्रव कचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनासाठी पर्यावरणीय नुकसान भरपाई म्हणून महाराष्ट्र सरकारला  12,000 कोटी रुपये देण्याचे निर्देश देणाऱ्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

NGT च्या सप्टेंबर 2022 च्या आदेशाला आव्हान देत महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) महाराष्ट्र सरकारला राज्यातील अयोग्य कचरा व्यवस्थापनासाठी पर्यावरणीय नुकसान भरपाई म्हणून 12,000 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले होते.

"एनजीटी कायद्याच्या कलम 15 नुसार भरपाई देणे आवश्यक आहे ते घन आणि द्रव कचऱ्याच्या व्यवस्थापनातील त्रुटींमुळे पर्यावरणाचे सतत होणारे नुकसान भरून काढण्यासाठी आवश्यक आहे," असे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्यावेळी म्हटले होते. (Latest Marathi News)

Supreme Court Stays NGT Orde
PM Modi:तेलंगणात मुख्यमंत्री ‘ओबीसी’च ! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन

एनजीटीने सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र सरकारवर दंड ठोठावला होता, कारण राज्य घन आणि द्रव कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरले आहे. आदेश पारित करूनही आठ वर्षांत घनकचरा व्यवस्थापन आणि पाच वर्षांत द्रव कचरा व्यवस्थापनाचे ठोस परिणाम दिसून आलेले नाहीत, असे एनजीटीने म्हटले होते. वैधानिक आणि विहित कालमर्यादा संपूनही परिस्थिती जैसेथेच आहे. एनजीटीच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. 

Supreme Court Stays NGT Orde
Prakash Ambedkar: राज्यात ३ डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचे धक्कादायक वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.