Bhagat Singh Koshyari : राज्यपाल हे नियमित गुन्हेगार; सुप्रिया सुळे संतापल्या

Supriya Sule Latest Marathi News
Supriya Sule Latest Marathi NewsSupriya Sule Latest Marathi News
Updated on

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वक्तव्याने चांगलेच निर्माण झाले आहे. यावर विरोधक असो किंवा सत्ताधारी आपापली प्रतिक्रिया देत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भगतसिंग कोश्यारी यांना नियमित गुन्हेगार म्हटले आहे. (Supriya Sule Latest Marathi News)

‘प्रत्येकाला समान वागणूक देणे ही राज्यपालांची जबाबदारी आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे लोकांमध्ये तेढ आणि फूट निर्माण करीत आहेत. त्यांनी लोकांना दुखावले आहे आणि ते नियमित गुन्हेगार आहे. मी राष्ट्रपतींना राज्यपालांना हटवण्याची विनंती करते’ असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

‘गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाही. तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे ती राहणार नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शुक्रवारी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिले. मात्र, त्यांच्यावर होणारे हल्ले काही कमी झालेले नाहीत.

कारण, आजवर त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे नेहमीच त्यांची खिल्ली उडवली जाते. राज ठाकरे यांनी अनेकदा त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची मेमेक्री करून दाखवली आहे. राज्यपाल नेहमीच असे वक्तव्य करीत असल्याने सुप्रिया सुळे यांनी त्यांना नियमित गुन्हेगार म्हटले आहे.

Supriya Sule Latest Marathi News
‘मुंबईचं वैभव गिळायचं आहे, हे मान्य केल्याबद्दल राज्यपालांना धन्यवाद देईन’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर दहा दिवसांनी दिल्लीला जातात. पुढच्या वेळी जेव्हा त्यांच्यापैकी एकाने दिल्लीला भेट दिली तेव्हा त्यांनी राज्यपालांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवायला हवे, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.