NCP : सुप्रिया सुळेंनी भाजप अध्यक्षांना स्पष्टचं सुनावलं; म्हणाल्या, जे-जे बारामती बघायला येतील त्यांचं..

'आमचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर विश्वास आहे.'
JP Nadda vs Supriya Sule
JP Nadda vs Supriya Suleesakal
Updated on
Summary

'आमचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर विश्वास आहे.'

कऱ्हाड (सातारा) : भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP President J. P. Nadda) म्हणताहेत एक देश एक पक्ष, मात्र आमचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर विश्वास असून त्यांच्या मते एक देश अनेक पक्ष यावर आम्ही ठाम आहोत. सगळ्यात चांगली गोष्ट सर्वांनी हवीहवीशी वाटते. तशीच अवस्था बारामतीची (Baramati) आहे. त्यामुळं जे-जे बारामती बघायला येत असतील, त्यांचं आम्ही स्वागत करु, असं स्पष्ट मत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केलं.

खासदार सुळे कऱ्हाड (जि. सातारा) दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, सत्यजितसिंह पाटणकर, देवराज पाटील, शहाजी क्षीरसागर, प्रशांत यादव आदी उपस्थित होते.

JP Nadda vs Supriya Sule
Satara : अक्कलेचे तारे तोडणाऱ्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची मला कीव येते - उदयनराजे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल संस्थाचालक अस्वस्थ आहेत. प्रत्येक संस्थेतील रिक्त जागा भरल्या पाहिजेत, अशी स्थिती आहे. अशातच उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्व खासगी शाळांचे पगार सरकारने केले तर तुम्ही फी कमी करणार का? असं विधान केलं आहे. मात्र, मंत्री जेव्हा असं म्हणताहेत तर राज्य सरकारचं हे धोरण आहे का? पगार देणार असाल तर मग तुमचे प्लॅन काय आहे? हे जाहीर करावं. त्यांनी काहीतरी आर्थिक नियोजन केलेलं दिसत आहे. असं असेल तर मी जावून त्यांचा सत्कार करेन, असंही सुळेंनी चंद्रकांत पाटलांचं नाव न घेता स्पष्ट केलं.

JP Nadda vs Supriya Sule
Rajasthan : सरकार पाडण्यासाठी आमदारांना 50 कोटींची ऑफर; गेहलोतांचा पायलटांवर गंभीर आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.