Pawar Vs Fadnavis : फडणवीस अजूनही पहाटेच्या शपथविधीत अडकलेत! सुप्रिया सुळेंनी करून दिली कर्तव्याची जाणीव

Supriya sule criticize devendra fadanvis
Supriya sule criticize devendra fadanvis
Updated on

राज्याच्या राजकारणात २०१९ साली अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या शपथविधीने खळबळ उडाली होती. दरम्यान या शपतविधीवरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या शाब्दीक युद्ध सुरू आहे. यादरम्यान या वादात आता राष्ट्रवादीच्या कार्यकरी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी उडी घेतली आहे.

शरद पवारांवरती होत असलेल्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकशाहीत शाब्दीक हल्ले होणं यात काही गैर नाही. लोकशाहीत अशा गोष्टी झाल्याच पाहिजेत. शरद पवरांवर वार करत नाही तोपर्यंत बातमी होत नाही हे मागचे ५५ वर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. आंब्याच्याच झाडाला लोक दगडं मारतात बाभळीला थोडी मारतात असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya sule criticize devendra fadanvis
Maharashtra Politics : राज्यात राजकीय घडामोडींना वेग! शिंदे गटातील 'या' नेत्यांची मंत्रीपदं अडचणीत

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस इतके त्या शपथविधीत अडकले आहेत याचं कारण त्यांना मुळ मुद्द्याला हात घालायचा नाही. त्यांना गृहमंत्री म्हणून राज्यातील प्रत्येक महिलेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे असे का वाटत नाही. ते महागाई, सिलेंडर, महिला सुरक्षा यावर का काही बोलत नाहीत? आज काही संदर्भ नसलेलं ते काढत बसतात.

प्रशासन सोडून सातत्याने मागे जाऊन गॉसिप करण यातचं हे मग्न आहेत. हे दुर्दैवी आहे. प्रशासन सोडून हे सरकार सगळं करतं असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या मला गॉसिप करायला वेळ नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.

Supriya sule criticize devendra fadanvis
Mumbai Traffic Update : पावसामुळे मुंबईकरांची दैना! पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पवार काय म्हणाले होते?

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गाजलेल्या पहाटेच्या शपतविधीवर देवेंद्र फडणवीांनी वक्तव्य करत शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी माघार घेतली आणि डबल गेम केला असं म्हटलं होतं.

यानंतर २०१९ साली सत्तासंघर्षाच्या घडामोडी सुरु असताना मी टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट गेली असे शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत माझ्या एका गुगलीने एकतरी सत्य बाहेर आलं,अशी प्रतिक्रिया दिली. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.