NCP Workshop in Shirdi: मी भाजपला भ्रष्ट पक्ष म्हणते ते काहीच उत्तर का देत नाहीत. पक्ष फुटीकडे लक्ष देऊ नका. दादांना गुडलक, सुखी राहा. दिल्लीने डोळे वटारले, तर तिकडे गेले. त्यांच्याशी काय लढणार. माझी लढाई भ्रष्टाचारी जुमला पार्टी असलेल्या भाजपच्या विरोधात आहे. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या, कुटुंब व पक्ष फोडणाऱ्या भ्रष्ट भाजपच्या विरोधात मी येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यभर फिरून रान उठविणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
पक्षाच्या मंथन शिबिरात पदाधिकारी व शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. खासदार शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार एकनाथ खडसे यांच्यासह पक्षाचे विविध प्रतिनिधी वेळी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या की, मी राजकारणात आल्यानंतर लोकसभेचे तिकीट वगळता त्यांच्याकडे काही मागितले नाही. तुम्ही म्हणता ती पूर्व दिशा होती. मोठ्यांचा आदर करायचा, हे संस्कार मला वडिलांनी दिले. त्यांनी आमचे घर फोडायचे आणि आम्ही वाद घालायचे, हे मला पटत नाही. भाजपच्या अपप्रचारामुळे लोक पूर्वी आमच्याकडे भ्रष्टाचाराच्या मुद्यावर संशयाने पाहायचे. आता अतिशय अनुकूल प्रतिसाद देतात. (Latest marathi News)a
सेवा, सन्मान व स्वाभिमान या त्रिसूत्रीवर आपली वाटचाल सुरू आहे. विधानसभेत आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवर नवे मुख्यमंत्री पहिली स्वाक्षरी करतील. महिला बचतगटांसाठी प्रत्येक तालुक्यात एक दुकान सुरू करू. कंत्राटी भरती बंद करू.
एकही मूल शाळेपासून वंचित राहाणार नाही. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी (कै.) आर. आर. पाटील व आमदार अनिल देशमुख यांच्या काळासारखे पोलिस दल करायला हवे. विजेपासून ते औद्योगिक वसाहतींपर्यंतचा विकास काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काळातच झाला. भाजपने विकास नेमका कुठे केला आहे. पक्षाच्या बळकटीकरणासाठी संघटना मजबूत करायची आहे.
शरद पवार स्वकर्तृत्वावर मुख्यमंत्री ः सुळे
(कै.) यशवंतराव चव्हाणांना आरएसएसची विचारधारा कधीच पटली नाही. वर्षातून एक दिवस त्यांच्या समाधीवर फुले वाहून त्यांचा वारसा चालवता येणार नाही. जे पक्षात दिग्गज म्हणून होते, ते दिग्गज आहेत का, हे आता जनताच ठरवेल. वारसा नसताना खासदार शरद पवार हे स्वतःच्या हिमतीवर मुख्यमंत्री राहिले. आम्हाला संसदेत बक्षिसे मिळतात, कारण आम्ही तेथे काम करतो. जनतेचे प्रश्न मांडतो, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Latest marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.