Supriya Sule News : मांसाहार करून देवदर्शन? शिवतारेंच्या 'त्या' आरोपावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Supriya Sules attack on BJP in Wardha District
Supriya Sules attack on BJP in Wardha DistrictSupriya Sules attack on BJP in Wardha District
Updated on

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी मांसाहार करून मंदीरात गेल्याचा आरोप केला असून याबद्दलचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या आरोपांवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी काल मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असा गंभीर आरोप शिवतारे यांनी केला आहे. शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचे मटण थाळी खातानाचे व्हिडिओ आणि फोटो फेसबुकवर पोस्ट करत टीका केली आहे.

दरम्यान विजय शिवतारे यांनी केलेल्या आरोपांवर माझ्या वाचनात अजून काही आलं नाही. संपूर्ण भागात पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे मी बघत आहे त्यामुळे ते काय बोलले मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Supriya Sules attack on BJP in Wardha District
Supriya Sule: शरद पवारांचा नियम सुप्रिया सुळेंनी मोडला; मटण खाऊन घेतलं देवदर्शन

विजय शिवतारे यांनी काय म्हटलं आहे?

विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरील देवदर्शनाचे चार फोटो शेअर केले आहेत. तसेच हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्यावर कमेंट केली आहे. आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला||, अशी टीका शिवतारे यांनी केली आहे.

महागाईवर चर्चा व्हायला हवी..

सगळ्या विरोधी पक्षाच्या भावना एका पत्राद्वारे मोदी यांच्या पर्यंत पोहचवल्या, केंद्राला विनंती आहे की संसदेमध्ये महागाई ची चर्चा व्हायला पाहिजे. गॅस दरवाढी बरोबर महागाई आणि बेरोजगारी या विषयाबद्दल आम्ही बोलत आहोत, आपली निर्यात कमी झाली आहे. देशात कांद्याला भाव नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sules attack on BJP in Wardha District
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह होणार बाबा? फोटोमुळं चर्चेला उधाणं

भाजपला पुणेकरांनी थम्स डाऊन दाखवला

कसबा पेठ पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या विजयाबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राची आणि कसबा मधील जनतेचे आभार मानते. भाजपला पुणेकरांनी थम्स डाऊन दाखवला. पुन्हा आता चर्चा विकासाची करू. तर चिंचवड येथे मिळालेल्या पराभवावर बोलताना आम्ही कुठले ही निवडणुका हरलो जिंकलो तरी आत्मपरीक्षण करतो असेही त्या म्हणाल्या.

Supriya Sules attack on BJP in Wardha District
एप्रिल-मेमध्ये ३२,३०० शिक्षकांची भरती! खासगी १७००० तर शासकीय १५००० पदे; ‘टेट’चा निकाल २० मार्चपूर्वी

राशन दुकाने बंद होणार?

राशन दुकान बंद या विषयावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, काल एक जी आर वाचायला मिळाले आणि एक डेलिगेशन भेटायला आले होते. त्यांनी सांगितलं की सरकार राशन दुकान बंद करण्याचा विचार सुरू आहे. असं झालं तर गरीब माणसाने कसे जगायचे. हा जीआर कुठल्या धर्तीवर काढले आहे. या मागे काय षडयंत्र आहे हे पाहावं लागेल. सरकारचे या मागे काय विचार करत आहे हे पारदर्शी पणे सांगायला हवे.

जर राशन बंद झाले तर फूड कॉर्पोरेशन काय करणार, मिनिमाम सपोर्ट प्राइस हा देखील प्रश्न उपस्थितीत होणार आहे. लोकसभेत आम्ही ८० कोटी लोकांना अन्न देता असं म्हणता मग आता या लोकांचे काय करणार असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.