मुंबई: राज्य सरकारने सुपर मार्केट तसंच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी दिल्यानंतर या निर्णयाला वेगवेगळ्या स्तरातून विरोध होत आहे. यासंदर्भातच आता वारकरी देखील आक्रमक झाले असून ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी देखील आपला ठाम विरोध दर्शवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने या निर्णयाविरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात. आणि त्याचे पुरावेदेखील आपल्याकडं असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले बंडातात्या कराडकर?
बंडातात्या कराडकर यांनी म्हटलंय की, नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेली आहेत. हे सांगताना त्यांनी काही जणांची नावं घेतली. ते म्हणाले की, पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या देखील दारु पितात, असा त्यांनी उल्लेख केला आहे. पुढे त्यांनी सवाल केला की, कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा. तसंच आपण नावं घेतली आहेत आणि त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असंही म्हणाले. पुढे ते म्हणाले की, सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं आहे.
यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, एका कीर्तनकाराच्या तोंडात या प्रकारची भाषा शोभत नाही. ते त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलले आहेत. तसेच ते खरेच वारकरी आहेत की नाही हे तपासायची गरज होती, असंही विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे-अजित पवार म्हणजे ढवळ्या पवळ्याची जोडी
बंडातात्या कराडकर यांनी टीका करताना पुढे म्हटलंय की, उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पोवळा बांधला आहे. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले की, “ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे”. यावेळी ढवळा कोण? पोवळा कोण? असं विचारल्यावर त्यांनी उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार असं ते म्हणाले. अजित पवारांनी दारु विकण्याचा गुण लावला. त्यांनीच मंदिरं खुली करायची नाहीत असं सांगितलं. हे सगळं अजित पवारांचं आहे. मी जाहीर सांगत असतो की ही सगळी मनमानी, दादागिरी..काय अजून लिहायचं असेल ते लिहा, असंही ते म्हणाले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.