Pune Latets News: ‘‘राज्यात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला मिळणाऱ्या जागेवरील उमेदवाराला आमचा पक्ष पूर्ण सहकार्य करील. पक्षाचे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील,’’ अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
भुकूम (ता. मुळशी) येथे पक्षाच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘पुढील निवडणुकी विधानसभा मतदारसंघ रचनेत बदल होणार आहे. मुळशी हा मतदारसंघ होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. भूगावचा बायपास होण्यासाठी पूर्तता होत आली आहे.