भाजप विरोधात असलेली माझी लढाई राजकीय लढाई आहे. यात वैयक्तिक काहीच नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे दिल्लीत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र त्यांच्या ऐवढेच माझेही दिल्लीसोबत चांगले संबंध आहेत. माझे आणि माझे पती सदानंद सुळेंचे अनेक भाजपच्या नेत्यांबरोबर कौटुंबिक संबंध असून आम्ही मिनी पार्लिमेंट चालवू शकतो”, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. तसेच सुप्रिया सुळेंनी त्यांच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला आहे.