Supriya Sule : 'बॉस इज अलवेज राइट', शरद पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं पुन्हा गोंधळात टाकणारं विधान

supriya sule
supriya sule sakal
Updated on

मुंबईः आज सकाळी शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. पवारांनी त्यानंतर घुमजाव केलं. परंतु तोपर्यंत धुरळा उडाला होता. आता सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधून पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण केली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार हे आमचेच नेते आहेत. त्यावर शरद पवारांना प्रतिक्रिया विचारण्यात आलेली होती. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, आहेतच. त्यात काही वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, आज तशी स्थिती येथे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला, वेगळी भूमिका घेतली लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणण्याचं काही कारण नाही. हा त्यांचा निर्णय आहे. असं शरद पवार म्हणाले.

supriya sule
Jitendra Awhad : जनतेच्या मनातला चित्रपट 'जय भीम'च! आव्हाड यांची सणसणीत प्रतिक्रिया

शरद पवारांचं घुमजाव

शरद पवारांच्या सकाळच्या विधानामुळे राजकारणात खळबळ उडाली. परंतु पवारांनी नंतर घुमजाव केलं. ते म्हणाले की, पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी आम्ही अजित पवारांना संधी दिली. आता परत संधी मागायची नसते आणि मागितली तर ती द्यायची नसते. सध्या आमची भूमिका दुसरी आहे.

आमचे नेते असं मी म्हणालो नाही. सुप्रिया अजित पवारांना नेते म्हणाली. सुप्रिया त्यांची धाकटी बहीण आहे. त्याच्यामुळे बहीण-भावाच्या नात्यात बोललेल्या गोष्टीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली ते आमचे नेते नाहीत, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

सुप्रिया सुळेंचं पुन्हा गोंधळात टाकणारं विधान

शरद पवारांच्या घुमजावानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, आमच्या पक्षाच्या ९ आमदार आणि २ खासदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे कारवाई होईल. मला भावाला भेटायला सिक्रेट मीटिंग करायची गरज नाही. मी भाजपच्या अनेक नेत्यांना दिल्लीत भेटते. आमची भाजपशी वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक भांडण नाही.

supriya sule
Greece : PM मोदींचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ग्रीसच्या 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर'नं सन्मानित

अजित पवारांना राष्ट्रवादीचे दरवाजे खुले आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तो मला अधिकार नाही. मी लहान कार्यकार्ती आहे, खासदार आहे. वर्किंग प्रेसिडेंट म्हणून माझे बॉस पवार साहेब आहेत. ते देशाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सकाळी स्टेटमेंट केलं आहे. एकदा आपल्यापेक्षा मोठ्या नेत्याने एक स्टेटमेंट केलं असेल तर बॉस इज अलवेज राइट.. मी त्यावर काहीही बोलणार नाही.

काल सुप्रिया सुळेंनी केलेलं विधान आणि आज शरद पवारांनी केलेलं घुमजाव, अन् पुन्हा सुप्रिया सुळेंनी शरद पवार योग्य असल्याचं म्हणणं; गोंधळात टाकणारं आहे. नेमकी सुप्रिया सुळेंची भूमिका काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()