सोलापूर : कॉलेजमध्ये सोलार कार स्पर्धेत (Solar Car Competition) सहभागी झाल्यानंतर त्याची प्रेरणा घेत माचणूरच्या सूरज डोके (Suraj Doke) या तरुणाने माचणूर (ता. मंगळवेढा) ग्रामीण भागातच सौर उर्जेवरील चार (Solar Energy) उत्पादनांची निर्मिती केली. तब्बल १५ जणांना त्यांनी त्यातून रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.
माचणूरच्या सूरज डोके या तरुणानं सुरवातीला पंढरपूरला स्वेरी व सिंहगड महाविद्यालयात मेकॅनिकल अभियांत्रिकीत पदविका व पदवी मिळवली.
शिक्षण घेताना त्याला सोलार कार स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. स्पर्धेत देशपातळीवर स्पर्धकांशी संबंध आला. आपण ग्रीन टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे सौर क्षेत्रात काम करायचे ठरवले.
त्यांनी माचणूरला स्वतःच्या गावी म्हणजे, ग्रामीण भागात स्पार्टन टेक्नॉलॉजी उद्योगातून काम सुरु केले. तेव्हा सुरवातीला त्यांनी विविध गावातील सौर उर्जेवर आधारित उपकरणाची दुरुस्तीची कामे घेतली.
कामे मिळाल्यानंतर आपण दुरुस्ती करु शकतो तर स्वतःची निर्मिती का करु नये, असा विचार करून त्यांनी उत्पादनात हात घातला. ग्रामीण भागात सौर पथदिव्यांना विक्रीपश्चात सेवा देण्याचे धोरण त्यांनी हाती घेतले. त्यांना थिंक ट्रान्स फाउंडेशनने स्टार्टअपसाठी पाठबळ दिले.
सौर पथदिवे, हायमास्ट दिवे, वॉटर हिटर, कृषी पंप कंट्रोलर व सोलार रुफटॉप ही उत्पादने घेण्यास सुरवात केली. वीजबिलाचे प्रश्न, दुरुस्ती व देखभालीच्या अडचणीवर त्यांच्या उत्पादनांमुळे मात होऊ लागली.
ग्राहकांच्या गरजाप्रमाणे डिझाईन तयार करुन देखभाल सेवेने त्यांच्या उत्पादनांची वेगळी ओळख निर्माण झाली. सांगली, नाशिकसह सोलापूर जिल्ह्यात त्यांनी त्यांची उत्पादन विक्री सुरुच ठेवली. या उद्योगवाढीमध्ये त्यांच्या पत्नी व भाऊ हे इंजिनिअर असल्याने सहभागी झाल्याने उद्योगाचा विस्ताराला वेग आला.
ग्रामीण भागातील समस्या जाणून सौर उर्जा उत्पादन निर्मिती
चार उत्पादनांची निर्मिती व विक्री पश्चात सेवा
ग्राहकाच्या गरजेनुसार डिझाईन करुन उत्पादनांचे इन्स्टॉलेशन
१५ जणांना थेट रोजगार
२ किलो वॅट ते २ मेगावॅट क्षमतेची उत्पादने
ग्रामीण भागात काम करताना उत्पादनांची विक्री पश्चात सेवा देत असल्याने चांगल्या पध्दतीने त्याला प्रतिसाद मिळतो आहे. पुढील काळात इलेक्ट्रीक व्हेईकल व सेंद्रीय उत्पादन निर्मितीत काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
-सूरज डोके, उद्योजक, माचणूर, ता. मंगळवेढा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.