Sushma Andhare: सुप्रीम कोर्टाच्या निकालावर चर्चेला या! अंधारेंचं फडणवीसांना खुलं आव्हान; म्हणाल्या, अभ्यास...

सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालातील 'रिझनेबल पिरियड' म्हणजे काय हे देखील अंधारे यांनी सांगितलं आहे.
devendra fadnavis and sushma andhare
devendra fadnavis and sushma andharesakal
Updated on

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टानं काल निकाल दिला, या निकालाचं विश्लेषण राज्यातील विविध नेते आपल्या परीनं करत आहेत. यामध्ये सत्ताधारी शिंदे-फडणवीस हा निकाल आपल्याच बाजूनं असल्याचं सांगत आहेत तर विरोधक हा निकाल आपल्याच बाजूनं असल्याचं म्हणत आहेत. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना टार्गेट करत या निकालावर चर्चेसाठी खुल आव्हान दिलं आहे. (Sushma Andhare challenges Devendra Fadnavis to discuss Supreme Court verdict)

devendra fadnavis and sushma andhare
Parabhani Death: मैला साफ करताना मृत्यू; सफाई कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर

अंधारे म्हणाल्या, १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुन्हा सभागृहात विधानसभा अध्यक्षांकडं गेला आहे. यावरुन फडणवीस स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. पण निकालात असं स्पष्ट म्हटलंय की, दहाव्या सूचीनुसार पक्षांतरासंबंधीचे अधिकार कोणाला असतील तर ते अध्यक्षांना असतील.

devendra fadnavis and sushma andhare
Sanjay Raut: "प्रशासकीय अधिकारी, पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत"; राऊतांनी मांडली भूमिका

यामध्ये जर दोन-तृतीयांश आमदार एकाचवेळी पक्षातून बाहेर पडले असतील तर प्रोब्लेम नाही. पण जर थोडे थोडे करुन गेले असतील तर यावर अध्यक्षांनी निर्णय द्यावा आणि इथं थोडे-थोडे लोक बाहेर पडले आहेत. आधी १६ मग २३ आमदार गेले, त्यामुळं या संबंधी अध्यक्षांनी निर्णय घ्यावा पण तोही रिझनेबल पिरियडमध्ये घ्यावा असंही कोर्टानं म्हटलं आहे.

devendra fadnavis and sushma andhare
Imran Khan : सुप्रीम कोर्टाच्या आदेशापूर्वीच इम्रान खान यांच्या सुटकेच्या सुरु होत्या हालचाली? ताजी ऑडिओ क्लीप व्हायरल

रिझनेबल पिरियड म्हणजे काय?

पण रिझनेबल पिरियडचा अर्थ कोर्टानं असा सांगितला आहे की, जुलै २०२० मध्ये केई शामचंद्र विरुद्ध मणिपूर विधानसभा अध्यक्ष या खटल्यात सुप्रीम कोर्टानं निर्णय देताना पान क्रमांक २७ वर स्पष्टपणे म्हटलं आहे की, याचिका दाखल झाल्यापासून तीन महिन्यात निर्णय द्यावा. आमची याचिका दाखल होऊ ७ महिने झाले आहेत. तसेच एकनाथ शिंदे हे पक्षावर आपला दावा करु शकत नाही, उद्धव ठाकरे हेच पक्षाध्यक्ष आहेत.

वाजपेयींचा उल्लेख कर फडणवीसांना लगावला टोला

त्यामुळं देवेंद्र फडणवीस आता तरी नैतिकतेच्या बाता कमी करा. हवंतर आपण समोरा समोर डायसवर उभं राहून चर्चा करु, मी लहान आहे आपल्यापेक्षा पण आपल्याला खुलं चर्चेच निमंत्रण देते, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी त्यांना थेट आव्हान दिलं आहे. तसेच नैतिकतेच्या गप्पा मारताना दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करत आपण भाजपचे नेते आहात तर भाजपच्याच नेत्यांचा अभ्यास करत चला, असा टोमणाही लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.