Sharad Pawar: सुषमा अंधारेंचं शरद पवारांना भावनिक पत्र, म्हणाल्या…

Sharad Pawar
Sharad Pawar
Updated on

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. सुषमा अंधारे यांनी शरद पवारांना भावनिक पक्ष लिहलं आहे. ( sushma andhare emotional facebook post after sharad pawar announcement retirement )

‘लोक माझे सांगाती’ आत्मचरित्र प्रकाशनाचा कार्यक्रम मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू असताना शरद पवार यांनी आपल्या भाषणात राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली. अद्याप उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, सुषमा अंधारेंचं भावनिक पत्र चर्चेत आलं आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar: साहेब, आम्हाला पोरकं करून जाऊ नका; शरद पवारांना कार्यकर्त्यांची भावनिक साद

काय म्हणाल्या आहेत पत्रात?

आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब

अध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस

सर नमस्ते.

खरंतर मी आपल्याला लिहावे किंवा सांगावे एवढी प्रज्ञा निश्चितच माझी नाही. पण तरीही सर, मोठ्या धाडसाने हे लिहिले पाहिजे. मी आपल्या पक्षाची कधीच साधी प्राथमिक सदस्य ही नव्हते. पण आपला निर्णय एकूणच फक्त पक्ष म्हणुनच नाही तर, महाराष्ट्रातील बहुजन उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बुज असणारा नेता म्हणून ज्यांना जाण आहे त्या कोणालाही मानवणार नाही.

Sharad Pawar
Ajit Pawar : अजित दादांच्या मनात चाललयं तरी काय? पवारांच्या राजीनाम्यावेळी त्यांच्या या ४ कृती ठरल्या लक्षवेधी

सर , बदल हा सृष्टीचा नियम असतो जे काल होते ते आज असेलच असे नाही जे आज आहे ते उद्या राहीलच असे नाही पण असे असले तरी काही गोष्टीत लोकांना बदल अजिबातच मान्य नसतो महाराष्ट्राच्या बुजुर्ग व्यक्ती म्हणून आपला हा निर्णय अजिबातच न पटणारा आहे.

सर, कदाचित आपल्या नंतर आपल्या पक्षाला अध्यक्ष मिळतील आणि ते खूप निष्ठेने आणि प्राणपणाने पक्ष वाढीसाठी काम करतील ही पण सर , माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेली मुलगी असेल, मोतीराज राठोड असतील, व्यंकप्पा भोसले असतील, इचलकरंजीचे पवार असतील, निलंग्याचे विलास माने असतील ही माणसं आपण उभी केलीत.

कुणी काहीही म्हटलं तरी रामदास आठवले हे नेतृत्व पहिल्यांदा आपल्या पारखी डोळ्यांनी हेरले. आपल्या पुढाकारामुळेच पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीतले चार खासदार एकत्रितपणे निवडून आले.

Sharad Pawar
Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीआधी पवारांच्या राजीनाम्याच्या धक्कातंत्राने विरोधकांच्या गोटात चिंता वाढली

सर, एकीकडे ना धो महानोर यांच्यासारखे शेतीमातीशी नाळ असणारे जाणकार साहित्यिक आपल्या सभागृहात असले पाहिजे तर दुसरीकडे तीन दगडाच्या चुलीवरचे अन्न शिजवून खाणारे आणि जन्मभर भटकंती केली तरी मेल्यावर स्मशानभूमीचा प्रश्न उरावा अशा भीषण दुर्भिक्षातून उभे राहिलेले लक्ष्मण मानेंसारखे लोकही सभागृहात असावे हा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग आपण केला.

सर, शेतीच्या सातबारावर घरातल्या पुरुषाइतकेच माय माऊलीचे सुद्धा नाव असले पाहिजे हा क्रांतिकारी निर्णयसुध्धा आपल्याच काळातला !

सर, कोणताही पक्ष किंवा संघटना चालवण्यासाठी चार गुणांची चतुसूत्री एकत्र असणे अत्यंत गरजेचे असते .

एक नेतृत्व , दोन वक्तृत्व , तीन विचारधारा , चार संघटन कौशल्य. आपल्या ठायी या चारही गुणांचा संगम आहे हे सत्य महाराष्ट्रात काय भारतातला कोणीही नाकारता येणार नाही.

शतकातला नेता म्हणूनही आपला एक वेगळा उल्लेख आहे. आपल्या निर्णयाने राष्ट्रवादी पक्षाचे काही नुकसान होत आहे का किंवा आपल्यानंतर या पक्षाचे नेतृत्व करण्यास कुणी सक्षम आहे किंवा नाही या सगळ्या बाबींमध्ये जाण्याची अजिबातच इच्छा नाही.

...... पण आपला अनुभव प्रश्न हाताळण्याचे हातोटी, कमालीचा संयम या सगळ्यांची आज गरज आहे एकूणच महाराष्ट्र आणि देश ज्या संक्रमण काळातून जात आहे त्या संक्रमण काळात हुकूमशाही आणि दमण यंत्रणेच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला एका ज्येष्ठ बुजुर्गाचे नुसते आशीर्वादच नाही तर मुत्सद्दी राजकारणाचा अनुभव आणि दिशादर्शक मार्गदर्शनही हवे आहे.

प्रा. सुषमा अंधारे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()