Sushma Andhare : ''मनोज जरांगे अन् छगन भुजबळ यांचा मुद्दा भरकटला'', सुषमा अंधारे म्हणाल्या...

Sushma Andhare : ''मनोज जरांगे अन् छगन भुजबळ यांचा मुद्दा भरकटला'', सुषमा अंधारे म्हणाल्या...
Updated on

मुंबईः ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. दोघांचाही फोकस हलला असून राजकीय चिखलफेक सुरु झाली आहे, असं त्या म्हणाल्या. शिवाय जरांगेंना उद्देशून, एकीकडे मागास म्हणवून घ्यायचं आणि दुसरीकडे शंभर जेसीबींमधून फुलं उधळायची, हे काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, मनोज जरांगे आणि छगन भुजबळ या दोघांचाही मुद्दा भरकटला आहे. त्यांच्यात आता राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. याआधी आरक्षणासंदर्भात ५८ मोर्चे निघाले होते. जरांगे सध्या फिरतात, बोलतात चांगली गोष्ट आहे. परंतु एकीकडे ते आर्थिक मागास म्हणून सांगतात आणि आणि दुसरीकडे १०० जेसीबींमधून फुलं उधळली जात आहेत, याचं काय कारण आहे?

Sushma Andhare : ''मनोज जरांगे अन् छगन भुजबळ यांचा मुद्दा भरकटला'', सुषमा अंधारे म्हणाल्या...
Rajasthan Election : सचिन पायलट यांच्याविषयी पंतप्रधानांची पुन्हा सहानुभूती; म्हणाले, एक गुर्जरांचा मुलगा...

छगन भुजबळ यांच्याबद्दल बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, वैयक्तिक चिखलफेक होईल, असे बोलणे टाळले पाहिजे. भुजबळ एवढं बोलत असतील तर ते उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व कसे स्वीकार करतात? संभाजी राजे यांनी घेतलेली भूमिका चांगली आहे आणि आता आरक्षणाविषयी भुजबळ आणि मनोज जरांगे यांनी एकत्रित बसले पाहिजे. या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला पाहिजे, असं अंधारे म्हणाल्या.

Sushma Andhare : ''मनोज जरांगे अन् छगन भुजबळ यांचा मुद्दा भरकटला'', सुषमा अंधारे म्हणाल्या...
Elephant Rescued Video: शेततळ्यात अडकलं हत्तीचं पिल्लू, बचावकार्य पूर्ण होताच...

धीरेंद्र शास्त्री यांच्याबद्दल बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, कसलं हे बागेश्वर सरकार? हे सरकार तिथे त्यांच्या 'धाम'मध्ये बसलंय का? काय हे नकलीपणा आणि थोतांड लावलं आहे? हे सगळं कशासाठी करायचं? आणखी एका दाभोलकरांची हत्या करण्यासाठी? की आणखी एका गौरी लांकेश यांना गोळ्या झाडण्यासाठी? असं म्हणत त्यांनी धीरेंद्र शास्त्रींवर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.