महाप्रबोधन यात्रेतील ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सुषमा अंधारे, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांचा समावेश आहे. यानंतर सुषमा अंधारे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी कायदा माझ्या बापाने लिहला आहे. असे विधान केलं आहे. जे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. (Sushma Andhare Reaction After Case Register Pm Narendra Modi)
ठाण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महाप्रबोधन यात्रा मेळावा पार पडला. या जाहीर मेळाव्यात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिमा मलीन केली. अन्य नेत्यांबद्दलही अवमानजनक शब्द वापरल्याप्रकरणी शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभागाप्रमुख बाळा गवस यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाल्या अंधारे?
“मला अद्यापही पोलिसांची कोणतीही नोटीस प्राप्त झाली नाही. मिळाली तर पोलीस ठाण्यात हजर होईल. कारण, कायदा माझ्या बापाने लिहला आहे. त्याचा आदर मी नाही करायचा तर कोणी करायचा. त्या नोटीसीला कायदेशीर उत्तर देण्यात येईल,” असेही अंधारे यांनी स्पष्ट केलं.
तसेच, जो कोणी सत्य बोलेल त्याला भीती दाखवली जाते, त्यामुळे धक्का बसण्यासारखं काही नाही. मोदीजींची नक्कल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असेल तर ती नक्कल नाही. माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरेंनी केल्या आहेत. देशात प्रश्न विचारणे आणि सत्य मांडणे गुन्हा असेल, तर आम्ही गुन्हेगार आहोत. असही अंधारे म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.