Sushma Andhare: सुषमा अंधारेंचा मोठा निर्णय दिला 'या' सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा

राज्यात अनेक नेते मंत्री वारंवार महापुरूषांबद्दल वादग्रस्त विधान करत आहेत
Sushma Andhare
Sushma Andhareesakal
Updated on

राज्यात अनेक नेते मंत्री वारंवार महापुरूषांबद्दल वादग्रस्त विधान करत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. हे असतानाच काल चंद्रकांत पाटील यांनी देखील वादग्रस्त विधान केलं त्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण झाला. हे घडत असतानाच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमां अंधारे यांनी आपल्याकडे असलेल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

अंधारे यांनी उच्च व तंत्र शिक्षण खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. सुषमा अंधारे यांनी हा राजीनामा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडं पाठवला आहे तर राजीनाम्याचं पत्र त्यांनी फेसबुक अकाऊंटवर शेअर केलं आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काय विधान केलं होतं

शाळा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलेलं नाही, त्यांनी लोकांकडं भीक मागितली. हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं.

Sushma Andhare
Chandrakant Patil: शाईफेकीच्या घटनेवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
Sushma Andhare
Chandrakant Pati: भाजपचे नेते भीक मागून आमदार खासदार झाले का? राष्ट्रवादीचा सवाल

सुषमा अंधारे यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले , कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्व मंडळी आमच्या जगण्याचे आदर्श आहेत. पण गेली काही महिने सातत्याने या महापुरुषांचा अपमान करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून घडवून आणले जात आहे. महामहीम राज्यपाल पदावरील व्यक्तीपासून ते ना. मंत्री, सभागृहातील सदस्यांपर्यंत रोज कुणीतरी महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य आणि महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवणे याची जणू स्पर्धाच लागली आहे.

समितीतील इतर सदस्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांच्या सत्सत विवेक प्रश्न आहे मात्र माझ्यासाठी अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य पदाची जबाबदारी जी साधारण वर्षभरापूर्वी मी स्वीकारली होती. व सत्तांतरानंतरही निव्वळ बाबासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी म्हणून ही जबाबदारी घेतलेली होती. परंतु ही समिती उच्चतंत्र शिक्षण मंत्रालयाच्याच अखत्यारीत येते आणि जर याच खात्याचे मंत्री यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतके हिन दर्जाचे विचार असतील तर समितीतील सदस्य पदापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान आमच्यासाठी लाख पटीने महत्त्वाचा आहे.

सबब आपण केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ

मी या समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.