Sushma Andhare: राज, उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं का? सुषमा अंधारेंनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विरोधीपक्षात पोकळी निर्माण झाल्याची स्थिती असल्यानं उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Sushma Andhare: राज, उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं का? सुषमा अंधारेंनी स्पष्टच सांगितलं
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विरोधीपक्षात पोकळी निर्माण झाल्याची स्थिती असल्यानं उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चेवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील अशीच इच्छा व्यक्त केली आहे. (Sushma Andhare stand on discussion of Raj Thackeray and Uddhav Thackeray come together)

Sushma Andhare: राज, उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं का? सुषमा अंधारेंनी स्पष्टच सांगितलं
Jitendra Awhad: आव्हाडांचा खळबळजनक दावा! शिंदेंच्या बंडांनंतर २४ तासांत पत्र तयार होतं पण...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये ऋणानुबंधाचं नातं आहे आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर त्यावर नक्कीच विचार केला पाहिजे. पण शेवटी याबाबतचा निर्णय हा नेतृत्वानं घ्यायचा आहे. या संपूर्ण मुद्द्यावर राज ठाकरे स्वतः बोलत नाहीत तोपर्यंत मी बोलणार योग्य नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Sushma Andhare: राज, उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं का? सुषमा अंधारेंनी स्पष्टच सांगितलं
MVA: मविआ अजूनही अभेद्य! पवार, ठाकरे अन् पटोले एकत्र करणार महाराष्ट्र दौरा

राष्ट्रवादीचा कधीच भाग नव्हते

मी कधीच राष्ट्रवादीचा भाग नव्हते. बाबासाहेबांनी जसं सांगितला आहे की संस्थात्मक काम महत्त्वाचा आहे. जर काही काम करायचं असेल तर नेहमी संस्था निवडली पाहिजे. व्यक्ती की संस्था यात नेहमी संस्थाच निवडली पाहिजे. मूळ संस्था ही विचारांशी बांधील असते, अशा शब्दांत अंधारे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीवर बोलताना म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Sushma Andhare: राज, उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं का? सुषमा अंधारेंनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar: "परवानगीशिवाय माझा फोटो वापरु नयेत अन्यथा..."; शरद पवारांचा अजितदादा गटाला इशारा

ठाकरेंच्या दौऱ्याचा मविआला फायदा

ठाकरेंच्या दौऱ्याचा त्याचं 'एकला चलो' असा चुकीचा अर्थ का काढला जात आहे. आमच्या दौऱ्यानं महाविकास आघाडीचा फायदाही होऊ शकतो. दौरे काढले जात आहेत कारण मूळ आणि दूरवर पसरलेल्या शिवसैनिकांपर्यंत पोहोचता येईल राष्ट्रवादीकडूनही अशा प्रकारचे दौरे काढले जात आहेत. आता पावसात दौरे घेणे शक्य नाही.

परंतू पक्ष बांधणीसाठी दौरे काढणं गरजेचं आहे कारण कुठेतरी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागण्याआधी दौरे घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जुने शिवसैनिक आणि निष्ठावंत यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी दौरे गरजेचे आहेत. ठाकरेंसह आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचेही दौरे होतील, अशी माहिती यावेळी सुषमा अंधारे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.