मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची मागणी मनसेकडुन करण्यात आली आहे. तर, भाजप नेते नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. हे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या हल्ला प्रकरणात थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.
सुषमा अंधारे बडनेरा येथे सभा होती. या सभेमध्ये अंधारे यांनी संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, संदीप देशपांडे यांच्यावर असा हल्ला झाला असेल तर खरंच निषेधच आहे. पण कालच्या कसब्यातील पराभवाची चर्चा होत असल्याने देवेंद्रजीनी चर्चा दुसरीकडे वळवण्यासाठी तर हे केलं नाही ना, असं सुषमा अंधारे यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या की, संदीप देशपांडे यांना थोडं खरचटलं आहे. त्यांना काहीच होऊ नये. यावेळी लोकांनी त्यांना पळू पण दिलं नाही, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे काल (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. रोज त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र शुक्रवारी ते एकटेच असल्याची संधी साधून दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात स्टंप होते. त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला. मात्र, हल्लेखोरांना संदीप देशपांडे यांनी चांगलाच प्रतिकार केला.
हल्लोखोरांशी झालेल्या झटापटीत संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र त्यांना डोक्याला किंवा शरीरावर इतर कुठे जखम झाली नाही. हल्ल्यानंतर शिवाजी पार्कमधील लोक त्यांच्या मदतीला धावले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले. हल्ल्यानंतर जखमी देशपांडेंना हिंदूजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरेही आले. तर गंभीर इजा नसल्यानं उपचार करुन संदीप देशपांडेंना डिस्चार्ज देण्यात आला. अज्ञातांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि धमकी देणे अशा कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आज संदीप देशपांडे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते घटनेसंबधित काही माहिती किंवा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.