Sushma Andhare : अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंची शिंदेंच्या शिवसेनेला सोडचिट्ठी, कारण...

Sushma Andhare and Vaijnath Waghmare'
Sushma Andhare and Vaijnath Waghmare'
Updated on

मुंबई - शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश करून ठाकरे गटाची भक्कमपणे बाजू मांडू लागल्या. त्यानंतर काही दिवसांतच सुषमा अंधारे यांचे विभक्त पती ॲड. वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती होते. मात्र आता वाघमारे यांनी शिंदे गटाला अर्थात शिवसेनेला जय महाराष्ट्र करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

Sushma Andhare and Vaijnath Waghmare'
IPS Officer Transfer : राज्यातील ११ वरिष्ठ आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश केला होता. शिवाय शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील मिळाले होते. मात्र पक्षाकडून कोणतीच महत्त्वाची जबाबदारी दिली जात नसल्याने त्यांनी शिवसेना पक्ष सोडण्याचा निर्णय़ घेतला. त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झाला नसून त्यांच्या समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत साम टीव्हीने वृत्त दिलं आहे.

Sushma Andhare and Vaijnath Waghmare'
Barsu Refinery News : स्थानिकांच्या समंतीनेच बारसू रिफायनरी प्रकल्प होणार ; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं

ॲड. वैजनाथ वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांना थेट इशारा देत त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं पक्षप्रवेशावेळी म्हटलं होतं. शिवाय लवकरच सुषमा अंधारे यांचा पर्दाफाश करणार असल्याचा इशाराही ॲड. वाघमारे यांनी दिला होता. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश विशेष चर्चेत आला होता.

यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं की, वैजनाथ वाघमारे यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. कोण कोणत्या गटात जातो, याने मला फरक पडत नाही. ज्याला त्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, असंही त्या म्हणाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.