मुंबई : विधानसभेत टीका करताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) नक्कल केल्यानं मोठा गदारोळ माजला. मोदींची नक्कल करताना त्यांनी केलेल्या अंगविक्षेपावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी 'भास्कर जाधव निलंबित करा' अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं.
मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर तो जसा महाराष्ट्राचा अपमान होतो तसा पंतप्रधानांचा अपमान केल्यावर तो देशाचा अपमान होत नाही का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधारी पक्षांना केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस भास्कर जाधव यांच्या कृतीवरुन भडकले आणि असा प्रकार खपवून घेतला जणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान, भास्कर जाधव यांनी अंगविक्षेप मागे घ्यावा आणि माफी मागावी अशी मागणी लावून धरली. जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत कामकाज चालू दिलं जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतला. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी मोठा गदारोळ केला. कामकाज पुढे जात नसल्यानं अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दोन वेळेला सभागृह तहकूब केलं. सुरुवातीला पंधरा मिनिटांसाठी त्यानंतर अर्धा तासासाठी सभागृहाचं कामकाज थांबवण्यात आलं.
दरम्यान, भास्कर जाधवांनी आपण पंतप्रधानांची नक्कल केली नसल्याचा दावा केला. मात्र, तरीही विरोधक त्यांनी मागावी या भूमिकेवर ठाम राहिले. यावेळी फडणवीसांना सभागृहाचं कामकाज थांबवून काय घडलंय याची चौकशी करावी असं म्हटलं. पण भास्कर जाधव यांनी कामकाज थांबवण्यापेक्षा मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो असं म्हटलं. पण अंगविक्षेत मागे कसं घेणार, उलट त्यांनी आपण ही कृती केल्याचं मान्य केल्यानं माफीच मागितली पाहिजे अशी मागणी भाजपच्या आमदारांनी लावून धरली. मी पंतप्रधानांबाबत कुठलाही असंसदीय शब्द वापरलेला नाही, त्यामुळं मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो, असं भास्कर जाधव म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.