परमबीर सिंग यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईला सुरुवात

28 अधिकार्‍यांविरोधात निलंबनाच्या कारवाईची शिफारस पोलिस महासंचालकांनी केली आहे.
police
policeesakal
Updated on
Summary

28 अधिकार्‍यांविरोधात निलंबनाच्या कारवाईची शिफारस पोलिस महासंचालकांनी केली आहे.

कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांना सेवेतून निलंबित केलं आहे. दरम्यान, सेवेतून निलंबित केलेल्या परमबीर सिंग यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. सिंग यांच्याविरोधात अखिल भारतीय सेवा नियम अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. शिवाय आणखी 28 अधिकार्‍यांविरोधात निलंबनाच्या कारवाईची शिफारस पोलिस महासंचालकांनी केली आहे.

police
'महाविकास'मध्ये फूट; शिवसेनेचा आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय

आज सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशात (Winter session) गृहमंत्री वळसे (Dilip valase patil) पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. मुंबई पोलिस दलातील पोलिस अधिकार्‍यांच्या निलंबनाच्या प्रस्तावाबाबत अबू आझमी (Abu Aazami) यांनी विधानसभेत लेखी विचारलेल्या प्रश्नाला गृहमंत्री वळसे पाटील यांनी उत्तर दिले आहे. परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्यासह 30 पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

या गुन्ह्यांच्या निपक्षपतीपणे तपास करण्यासाठी त्यांना सेवेत ठेवणे योग्य नाही, त्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस (Police) महासंचालकांनी सरकारला दिला आहे. यामध्ये पाच पोलिस उपायुक्त आणि पाच सहायक आयुक्त दर्जाच्या पोलिसांचा समावेश आहे. याबाबत काय अनियमितता झाली याचा तपशील अहवाल गृह खात्याने मागवला असून अहवालानुसार परमवीर सिंग आणि पराग मणेरे यांचे निलंबन करण्यात आल्याची गृहमंत्र्यांनी माहिती दिली आहे.

police
CISF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती; पगारही मिळणार चांगला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.