मोठी बातमी! ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील सोलापूर झेडपी शाळेवरील ‘त्या’ शिक्षकाचे आज निलंबन! प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केली ‘संवर्ग-१’मधील बदली रद्द

गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांच्या चौकशी समितीने अहवाल दिला आहे. तसेच जाधव याने संवर्ग- एकमधून बदलीसाठी पत्नी मनोरुग्ण असल्याचा दाखला बुलडाणा जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलकडून मिळविल्याचेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान, लातूर पोलिसांच्या पत्रानुसार जाधव याचे आज निलंबन होईल, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.
solapur
NEET exam friskingSakal
Updated on

सोलापूर : लातूरमधील नीट पेपर फुटीप्रकरणी अटकेतील शिक्षक संजय जाधव याने पोटशिक्षक नेमला नाही. शालेय समितीने पूर्वीच पोटशिक्षक नेमला असून त्यांना तसा अधिकार असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांच्या चौकशी समितीने अहवाल दिला आहे. तसेच जाधव याने संवर्ग- एकमधून बदलीसाठी पत्नी मनोरुग्ण असल्याचा दाखला बुलडाणा जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलकडून मिळविल्याचेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान, लातूर पोलिसांच्या पत्रानुसार जाधव याचे आज निलंबन होईल, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

नीट पेपर फुटीप्रकरणी अटकेत असलेल्या टाकळी टें. (ता. माढा) येथील जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक जाधव हा लातुरमध्ये क्लास चालवायचा. त्यासाठी सहजपणे लातूरला ये- जा करता यावे, यासाठी आंतरजिल्हा बदलीनंतर त्याने वस्तीशाळा निवडली. तेथे स्वतःच्या जागेवर पोटशिक्षक नेमल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश माढ्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांना दिले होते. यादव यांच्यासह विस्ताराधिकारी शोभा लोंढे, केंद्रप्रमुख फिरोज मणेरी यांच्या समितीने मंगळवारी (ता. २५) टाकळी टे. येथे जाऊन विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांच्या भेटी घेऊन चौकशी केली. त्यानंतर अहवाल शिक्षणाधिकारी शेख यांना सादर केला आहे.

शिक्षक जाधव याने दीर्घ रजा घेतली नाही. त्याने पोटशिक्षक नेमले नाही. २७ जून २०२३ रोजी त्याची टाकळी टे. येथील शाळेवर नेमणूक झाली. त्या शाळेची पटसंख्या ७८ असून ती वस्तीशाळा नाही. तेथे दोन शिक्षक होते. आणखी एका शिक्षकाची आवश्यकता होती. त्यामुळे त्याच्या नेमणुकीपूर्वी दीड वर्षे म्हणजे २८ डिसेंबर २०२१ रोजी शाळा व्यवस्थापन समितीने गावातील डी. एड. झालेल्या एका महिलेची तात्पुरती शिक्षक म्हणून नेमणूक केली होती. चालू शैक्षणिक वर्षात जाधव हा शाळा पूर्वतयारी म्हणजे १२ जूनपासून विनापरवाना गैरहजर होता. त्याने कुटुंबीय आजारी असल्याचे तोंडी मुख्याध्यापकांना कळवले होते, असे अहवालात म्हटले आहे.

संवर्ग एकमधून बदली रद्द, निलंबनाची कारवाई होणार

जाधव याने पत्नी मनोरुग्ण असल्याचा दाखला जोडून संवर्ग एकमधून अक्कलकोट तालुक्यात बदली मिळविली. त्याने त्यासाठी बुलडाणा जिल्हा सिव्हिल रुगणालयाचे प्रमाणपत्र जोडले आहे. मंगळवारी त्याला अटक झाल्यानंतर पोलिस कोठडी मिळाली असून तपास यंत्रणेच्या माहितीनुसार जाधव याचे निलंबन होईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट केले. पण, बुधवारी उशिरा नीट गैरव्यवहार प्रकरणातील तपास यंत्रणेकडून त्याबाबतचे पत्र प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे समजते. त्यानुसार जाधव याच्यावर शिक्षण विभागाकडून गुरूवारी (ता. २७) निलंबनाची कारवाई होणार हे निश्चित.

जाधव याचे शाळेतील कपाट सील

चौकशी समितीने सोमवारीच जाधव याचे टाकळी शाळेतील कपाट सील केले आहे. त्याबाबत शिक्षणाधिकारी शेख यांनी तसे आदेश दिले होते. तपास यंत्रणेकडून त्याच्या कपाटाचीही तपासणी होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.